Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाउन काळात गरजूंच्या वेदनेवर फुंकर; कृती फाऊंडेशन ठाणे टीम कडून २५ कुटुंबियांना अन्न धान्याचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाउन काळात गरजूंच्या वेदनेवर फुंकर; कृती फाऊंडेशन ठाणे टीम कडून २५ कुटुंबियांना अन्न धान्याचे  वाटप

ठाणे(प्रतिनीधी)- लॉकडाउनच्या काळात शहरातील विविध भागात असणाऱ्या भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटनांचे हात पुढे येत असून, यात कृती फाऊंडेशन देखील कुठंही कमी पडताना दिसत नाहीये. लॉकडाउन मुळे निराधार तसेच रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला.

हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन शासनाने केले आहे. या आवाहनाला कृती फाउंडेशनने प्रतिसाद देऊन गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम करत २५ गरजू कुटुंबाना किराणा किट देत मदतीचा हात दिला. सदर उपक्रम फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष कपिल महाजन, वैशाली महाजन यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. कपिल महाजन हे बीएसआय तर्फे सोशल रेस्पॉन्सिबिलिटी टीम लीडर आहेत. यापूर्वीच त्यांनी पीएम केअरला डोनेशन केले असून, ते बरेच सामाजिक उपक्रम बीएसआय साठी राबवित आहेत. कृती फाऊंडेशचे अन्य ठिकाणी देखील मोठया प्रमाणात गरजुंना मदतीचा हात देण्याचे उपक्रम सुरु आहेत.

मुंबई आणि ठाण्यात सध्या कोरोना फोफावत चालला आहे.अती स्फोटक, अति संवेदनशील आणि प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा  गेले ३-४ दिवस गरजूंचा सर्वे करून निवडक  २५ लाभार्थी ज्यात बांधकाम मजूर, माथाडी कामगार, रस्त्यावर बॅग विकणारी मुले, आदिवासी स्त्रीया, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या स्त्रिया ज्यांना गेले दीड महिने काम बंद असल्याने पगार मिळाला नव्हता, अश्यांचा समावेश करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत सदरचा उपक्रम राबविण्यात आला. येत्या महिन्यात आणीबाणीची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त गरीब कुटुंबाना अन्नधान्य वितरित करण्याचा मानस असल्याचे फाउंडेशनचे वैशाली महाजन यांनी यावेळी बोलून दाखविला. सदर उपक्रमाला डि.टी. महाजन, कुसुम घोगले यांचे सहकार्य लाभले तर दिपाली अहिरराव, किमया महाजन, अथर्व महाजन उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अवैध मद्यप्रकरणी एका दिवसात राज्यात ८० गुन्ह्यांची नोंद

Next Post

राज्यात कोरोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण

Next Post
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

राज्यात कोरोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d