जळगाव – (प्रतिनिधी) -आज दिनांक 14 नोव्हेंबर, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात बालक दिन उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बालक दिन भारतात आपण सारेच साजरा करीत असतो. त्याचे कारण म्हणजे नेहरूंजीच्या “लहान मुलांप्रती असलेले प्रेम, जिज्ञासा व शिक्षणावरील निष्ठा” कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रा डॉ. योगेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना बालक दिनाचे महत्त्व सांगत मुलांमध्ये सृजनशीलता, मूल्यशिक्षण, संवेदनशीलता आणि सामाजिक जाण विकसित करण्याचचा संदेश देताना, नेहरूजींचा जीवन प्रवास उलगडून सांगताना जन्म, विधी शिक्षण, त्यानंतर महात्मा गांधींजचे सानिध्य लाभले, स्वातंत्र चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवाला.

आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचे वडील कर्मवीर दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांनी देखील ब्रिटिश राजवटीतील आपल्या नोकरीचा त्याग करून महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. त्यावेळेस नेहरूजींचा आणि आपल्या संस्था परिवाराचा पारिवारिक संबंध प्रस्थापित झाले.

स्वातंत्र्य चळवळीत 1936 साली फैजपूर येथे काँग्रेसचे पहिले अधिवेशन आयोजित करण्याचे निश्चित झाले. त्या अधिवेशनात नेहरूजींनी आपल्या कर्मभूमीत आपल्या देशाला महात्मा गांधीजीं सोबत मार्गदर्शन केले अशा या दिव्य महात्म्यांचा सहवास आपल्या संस्था परिवाराला पूर्वीपासूनच लाभत आहे. विद्यार्थी मित्रहो त्यामुळेच आजच्या या बालक दिनी आपणास या क्षणाची आठवण आपणास देखील कायम स्मरणात राहो म्हणून सांगितली.

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. योगेश महाजन यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी मुलांच्या हक्कांचे संवर्धन आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.










