Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

छत्तीसगडच्या पायी जाणाऱ्या 24 प्रवासीची बसद्वारे करून दिली व्यवस्था

वरणगाव – नाशिक येथून छत्तीसगडकडे पायी निघालेले 24 परप्रांतीय प्रवासी यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी चहा, पाणी नाश्ता करून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना भुसावळ आगाराची बस उपलब्ध करून या 24 प्रवाश्याना त्यांच्या गावी छत्तीसगड येथे पाठविण्यात आले. यामुळे पुन्हा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या मदतीच्या कार्याची स्तुती होत आहे.

याबाबत सविस्तर असे की, नाशिक येथून छत्तीसगड येथे पायी जाणारे 24 प्रवासी वरणगाव महामार्गावरील गुरांच्या बाजाराजवळ कडक उन्हात उभे असल्याची माहिती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेंद्र चौधरी यांना समजली त्यांनी लगेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, यश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सविता माळी, शारदा माळी, गंभीर माळी, प्रवीण चौधरी, बाळा माळी, किरण माळी, टीनु माळी यांना गुरांच्या बाजाराजवळ पाठवून त्या पायी जाणाऱ्या 24 प्रवासी यांना चहा, पाणी, नाश्ताची व्यवस्था नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी लाऊन दिली.

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कामात दिरंगाई

या 24 प्रवाशी यांनी नाश्ता केल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणल्यानंतर येथील वैधकीय अधिकारी डॉ. हेंडवे मॅडम हे रुग्णालतात हजर नव्हते. आणि त्यांचा कर्मचारी स्टाफ नुसता 2 तास बग्याची भूमिका घेत असून कामात कुचराई आणि दिरंगाई करीत होते. हा प्रकर बघुन शहराध्यक्ष संतोष माळी यांनी जळगाव सिव्हिल सर्जन डॉ. एन.एस.चव्हाण यांच्याशी बोलून येथील प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी डॉ. देवर्षी घोषाल यांना तात्काळ येथे पाठऊन या प्रवासीची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यास सांगितले.

खरे मोलाचे सहकार्य यांचे

या 24 प्रवाशीची आरोग्य तपासणीसाठी त्याचाकडून फॉर्म भरून घेणे त्याच्या आधारकार्डाची झेरॉक्स काडून त्यांना योग्य माहिती हिंदी भाषेत देण्यासाठी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्त्या सविता माळी, यश चौधरी, प्रवीण चौधरी यांनी मदत केली. त्यानंतर जळगाव आगार प्रमुख यांच्याशी सविता माळी आणि संतोष माळी यांनी संपर्क साधून त्यांना 24 प्रवाशी यांना छत्तीसगड येथे सोडण्याची विनंती केली. त्यानंतर संतोष माळी आणि सविता माळी यांनी भुसावळ येथे जाऊन 24 प्रवाशी यांची आगारप्रमुख यांना नावांची यादी दिली. त्यानंतर भुसावळ आगरप्रमुख पि. बी. चौधरी यांनी कर्मचारी यांना बस सोडण्याची सूचना केली. त्यानंतर स्थानक प्रमुख पी.बि. भोई, एस.पि. चौधरी, जि. एन.झाबरे तसेच तहसीलदार दीपक धिवरे, एस.एल नागरे, एच.एल.महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बस पाहताच परप्रांतीयांचे चेहरे झाले हसरे

या 24 प्रवासीमध्ये तरुण, वृद्ध, महिला होते. सर्वांची आरोग्य तपासणी झ्हाल्यानंतर वरणगावला ग्रामीण रुग्णालतात सायंकाळी 5 वाजता बस येताच या 24 परप्रांतीय प्रवाशी यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली त्यांचे चेहरे आनंदी झाले. सर्व प्रवासी बस मध्ये बसल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सविता माळी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, साजिद कुरेशी, समाधान चौधरी, अल्पसंख्यांक संघटक पप्पू जकातदार, माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश चौधरी, गजानन वंजारी, यश चौधरी, प्रवीण चौधरी, किशन माळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बसमध्ये बसलेले परप्रांतीय 24 प्रवाशी यांना निरोप दिला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले

Next Post
गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले

गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d