Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई(प्रतिनिधी)- अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि प्रदूषण कमी करणे यावर राज्य शासनाचा भर असून वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने शासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरूवात केली असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आणि स्वीडन दरम्यान सह्याद्री अतिथीगृह येथे शाश्वतता पुढाकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस स्वीडनच्या मुंबईतील महावाणिज्यदूत एना लेकवल, वाणिज्य दूत एरीक माल्मबर्ग, राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदल रोखण्यासाठी महाराष्ट्राने विविध उपाययोजना केल्या आहेत. माझी वसुंधरा, इलेक्ट्रिक वाहन धोरण, उद्योग क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर, ४३ शहरांचा रेस टू झिरो मध्ये समावेश, अर्बन फॉरेस्ट अशा विविध माध्यमातून प्रदूषण कमी करण्याबरोबरच हिरवे आच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वीडनचे या क्षेत्रातील काम पाहता महाराष्ट्र आणि स्वीडन एकत्रितरित्या शाश्वततेच्या दिशेने उत्तम काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे माझी वसुंधरा अभियान, इलेक्ट्रिक वाहन धोरण, अर्बन फॉरेस्ट, किनारपट्टीचे संवर्धन आदी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. शाश्वतता म्हणजे हरित जीवनशैली हे उद्दिष्ट समोर ठेवून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर श्री.अन्बलगन यांनी एमआयडीसीमार्फत अक्षय ऊर्जेचा वापर आणि प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.वातावरणीय बदलांसंदर्भात महाराष्ट्र करीत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा करून स्वीडनच्या महावाणिज्यदूतांनी स्वीडन या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर चर्चासत्र

Next Post

पांगरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पांगरी स्मार्टपुर सेंटरचे उद्घाटन

Next Post
पांगरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पांगरी स्मार्टपुर सेंटरचे उद्घाटन

पांगरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पांगरी स्मार्टपुर सेंटरचे उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d