Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विज पडुन जिवीत हानी होऊ नये या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

  जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :- मान्सुन कालावधीत विशेषत:जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी”  ॲप तयार केले असुन सदरचे ॲप Google play Store  वर उपलब्ध आहे. या करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी / मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसुल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्स सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे ॲप GPS  लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापुर्वी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. या करिता आपले ॲप मध्ये आपले सभोवताली विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, याबाबतच्य सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ  कॉन्फरन्स आयोजित करुन दामिनी ॲप Google Play Store  वरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

          गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना सदर App-Download  करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या  Alert  नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी  जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जून रोजी लोकशाही दिन ऑनलाइन होणार

Next Post

शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

Next Post

शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d