Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात अभ्यासासोबतच शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघावे-अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

नूतन मराठा महाविद्यालय स्नेहसंमेलन दुसरा दिवस

जळगाव- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात अभ्यासासोबतच शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघावे. स्वप्नपूर्तीसाठी १२ वीनंतरच विद्यार्थ्यांने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘उडान-२०२०’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी, ३१ रोजी सकाळी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख तर प्रमुख पाहुणे अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे व महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. आय.परदेशी, संमेलनप्रमुख प्रा. डॉ. डी. एल. पाटील, तिन्ही उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. जे. पाटील, डॉ.एस. ए. गायकवाड, प्रा. डॉ. आर. बी. देशमुख आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, महाविद्यालय व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगल्या कार्य करणे महत्त्वाचे आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायला पाहिजे, असे व्ही.आय.परदेशी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला विशेष सत्कार

यावेळी गेल्या शैक्षणिक वर्षातील क्रीडा, सांस्कृतिक, विद्यापीठस्तरीय अविष्कार तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी हनुमान सुरवसे लिखित, अभिनीत व दिग्दर्शित ‘हलगी सम्राट’ नाटक महाराष्ट्रभर गाजत असून त्या टीम, संघप्रमुख प्रा.डॉ.राहुल संदाशिव यांचा आणि नाटकातील सागर भंडगर याची एका वाहिनीवरील कार्यक्रमात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसीतील विद्यार्थी सागर खलसे याने आर.डी.परेड, दिल्ली येथे सहभागाबद्दल त्याच्या आई-वडिलांचा गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. अफाक शेख यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.दिनेश पाटील, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.एस.एम.वानखेडे, प्रा.नितीन बाविस्कर यांच्यासह सर्व तासिका प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“प्रेमाची सायकॉलॉजी समजून घेऊया”

Next Post

तंबाखूमुळे आपण कर्करोग विकत घेतो – डॉ.नितीन चौधरी

Next Post
तंबाखूमुळे आपण कर्करोग विकत घेतो – डॉ.नितीन चौधरी

तंबाखूमुळे आपण कर्करोग विकत घेतो - डॉ.नितीन चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d