Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जळगाव शहरातील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे. त्या सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवानाधारक ऑटोरिक्षाला मोटार वाहन नियम 119 व 137 अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत परवाना अटींचे उल्लंघन करता येत नाही. अन्यथा ऑटोरिक्षा परवाना धारकावर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकरी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असून ही बाब कायदेशीर आहे. 1 नोव्हेंबर, 2021 रोजी झालेल्या लोकशाही दिनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक हे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविता अवाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन करण्यात येते की, सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी लवकरात लवकर आपल्या रिक्षांना फेअर मीटरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी. असे न झाल्यास संबंधित ऑटोरिक्षा परवाना धारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

विना फेअर मिटर तसेच ना-दुरुस्त फेअर मिटर असतांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांविरुध्द जिल्हाधिकारी, जळगाव व पोलिस अधिक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव व शहर वाहतूक शाखा, जळगाव यांचे संयुक्त पथकाव्दारे तपासणी मोहिम 9 नोव्हेबर पासून सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत एकूण 98 विना फेअर मिटर/ना- दुरुस्त फेअर मिटर असलेल्या ऑटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 67 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम अविरतपणे सुरु ठेवण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटोरिक्षा परवानाधारक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटोरिक्षा चालकाविरुध्द उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0257-2261819 किंवा [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करावी. तक्रार प्राप्त ऑटोरिक्षा परवानाधारकावर कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही श्री. श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दुचाकी वाहनांसाठी २३ नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका

Next Post

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

Next Post
महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d