Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्य पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव (प्रतिनिधी) दुर्लक्षित बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या बाल कल्याण समितीवर (सीडब्ल्यूसी) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन १०९८ च्या समुपदेशिका वृषाली जोशी यांची पुढील ३ वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.


बाल कल्याण समितीवर एक अध्यक्ष आणि चार सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाते. या समितीमध्ये महिला सदस्य असणे आवश्यक आहे. विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्यांचीच या समितीवर निवड केली जाते. बालकामगार तसेच अनाथ किंवा वाट चुकलेली मुले किंवा आई-वडील मारहाण करत असल्यास मुलांना पालकांसोबत राहायचे नसते किंवा जन्मत:च मुलांना बेवारस स्थितीत सोडून दिले जाते. अशा शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना बालकल्याण समितीपुढे हजर केले जाते. समितीने दिलेल्या आदेशानंतर मुलांची रवानगी शिशूगृह किंवा बालगृहात केली जाते. तसेच, या अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांचा शोध घेण्याबाबतही ही समिती संबंधित यंत्रणांना आदेश देते. मुलांच्या दत्तक प्रक्रियेच्या कामातही ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

त्यामुळे बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने बाल कल्याण समिती खूपच महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे मुलांना या समितीपुढे २४ तासांच्या आत हजर करणे गरजेचे आहे. पोलिसही मुलांना समितीपुढे घेऊन येतात. बाल कल्याण समितीसह जिल्ह्यात बाल न्याय मंडळही असते.म वृषाली जोशी यांनी चाईल्ड लाईनच्या माध्यामतून अनेक बालकांना मदत मिळवून देणे, बालविवाह थांबविणे यात सक्रिय योगदान दिलेले आहे. ओपन हाउस सारख्या उपक्रमातून बालकांचे समुपदेशनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, चाईल्ड लाईन समन्वयक भानुदास येवलेकर यांचेसह केशवस्मृती परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगांव ; भाजप प्रवक्त्या नपुर शर्मा विरोधात तक्रार अर्ज दाखल

Next Post

ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करावा

Next Post

ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d