Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘नॉन कोविड’ सुविधांना प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘नॉन कोविड’ सुविधांना प्रारंभ

पहिल्याच दिवशी रुग्णांचा उत्साही प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या कोरोना व्यतिरिक्त सेवांचा (नॉन कोविड) प्रारंभ गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी सुरू झाला आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निंभोरा ता. रावेर येथील रत्‍नाबाई एकनाथ भिल (वय ४०) यांना पहिला केसपेपर देऊन “ओपीडी” सुरू करण्यात आली.

यावेळी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर.यु. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.संजय बनसोडे आदी उपस्थित होते. सकाळी सुमारे दीड तास सर्व विभागांची तपासणी करून अधिष्ठाता, उप अधिष्ठाता व अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. रुग्णांशी देखील संवाद साधला.

कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून ५ एप्रिल २०२० पासून घोषित झाले होते. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी १६ डिसेबर पासून हे रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त सेवा देण्यासाठी सुरु करण्याची घोषणा केल्यावर गुरुवारी कोरोना व्यतिरिक्त वैद्यकीय सेवा प्रारंभ झाली. रुग्णालयात औषधांचा साठा देखील मुबलक उपलब्ध आहे. दिवसभरात स्त्री रोग, बालरोग, अपघात, विषप्राशन, दुखापती, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, नाक-कान-घसा, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, दंतचिकीत्सा, किडनी आजार, प्राण्यांचे चावे, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंग्यू, फुफ्फुस संबंधित, मणका-सांध्याचे आजार याबाबत उपचार घेण्यासाठी रुग्ण दवाखान्यात आले. रक्त, लघवी तपासणी विभाग देखील अद्ययावत झाला असून अहवाल तातडीने १५ मिनिटांच्या आत प्राप्त होत आहे. सकाळी ८. ३० वाजेपासून १२. ३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९ पुरुष व ५४ महिला अशा १३३ रुग्णांनी ओपीडीतील वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.

रुग्णांच्या बोलक्या प्रतिक्रिया


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त सेवा सुरु झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते. उपचार घेण्यासाठी शहरात मध्यवर्ती जागेत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गुरुवारी सकाळपासून उपचारासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक आले होते. यातील काही जणांनी तर ‘देव पावला’ अशी बोलकी प्रतिक्रिया देत रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त केले. वृद्ध, दिव्यांग, लहान बालके, गर्भवती महिला यांच्यासह सर्व वर्गातील स्त्री-पुरुष उपचारासाठी आले होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जामनेर तालुक्यातील शिवसैनिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज शिवसैनिकांनो निवडणूक रिंगणात सावध रहा-डॉ.मनोहर पाटील

Next Post

15 वा वित्त आयोगाचे निधी खर्च करण्या अगोदर प्रशिक्षण घेणे गरजेचे-भूषण लाडवंजारी

Next Post
15 वा वित्त आयोगाचे निधी खर्च करण्या अगोदर प्रशिक्षण घेणे गरजेचे-भूषण लाडवंजारी

15 वा वित्त आयोगाचे निधी खर्च करण्या अगोदर प्रशिक्षण घेणे गरजेचे-भूषण लाडवंजारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d