Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना मुलुंड विधानसभेतर्फे कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याविषयी कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांच्याशी केलेली बातचीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवसेना मुलुंड विधानसभेतर्फे कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याविषयी कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांच्याशी केलेली बातचीत

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

मुलुंड विधानसभा शिवसेनेचे कार्यालय प्रमूख सीताराम खांडेकर यांची मुलुंडमधील वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने त्याला रोखण्यासाठी शिवसेना मुलुंड विधानसभातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना व सामाजिक कार्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सीताराम खांडेकर यांनी देखील तितक्याच मनमोकळेपणाने चर्चा करुन मुलुंड विधानसभेत शिवसेनेने केलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली.

प्रतिनिधी: खांडेकरजी, मुलुंडमध्ये कोरोनाचा प्रभाव का वाढत आहे ? आणि येथील वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुलुंड शिवसेनेतर्फे काय प्रयत्न केले जात आहेत ?

सीताराम खांडेकर: मुळात मुलुंड विधानसभेत जिथे स्लम वस्ती आहे, अश्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही सोसायटय़ामध्ये एक किंवा दोन रुग्ण आढळत आहेत. स्लम विभागात दाटीवाटीने वस्ती आणि छोटी घरे असल्यामुळे लोकं एकत्र येण्याचे आणि सोशियल डिस्टेन्स न राखण्याचे प्रमाण जास्त आहे तसेच त्यांना शौचासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत असल्यामुळे तेथे संसर्गाचे प्रमाण थोडे अधिक आहेत तरीदेखील पालिकेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत व मुलुंड शिवसेनेतर्फे देखील रोजच्या रोज सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. तेथील नागरिकांना खबरदारीच्या सूचना व या कठीण काळात कश्या प्रकारे काळजी घ्यायची याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते वस्तीत जावून मेगाफोन द्वारे सतत देत आहेत तसेच शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, सोशल डिस्टेन्स ठेवणे, विनाकारण घराबाहेर न पडणे अश्या सूचना सर्वच स्लम विभागात व मुलुंडमधील इतर वस्तीमध्ये देखील शिवसेनेमार्फत केल्या जात आहेत.

प्रतिनिधी: लॉकडाऊनच्या काळात शिवसेना मुलुंड विधानसभे मार्फत कोणती सामाजिक कार्ये केली जात आहेत ?

सीताराम खांडेकर: मुलुंड विधानसभेत शिवसेनेच्या सहा शाखा येतात. शिवसेना पक्षप्रमूख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि विभागप्रमूख आमदार रमेश कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडच्या शिवसेनेच्या सहाही शाखा कार्यरत आहेत. विभागात सर्वत्र सॅनिटायझर फवारणी केली जात आहे, मास्क वाटप केले जात आहे, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केले जात आहे. काही शाखाप्रमुख रोज मजुरांना, गरिबांना अन्नाची पॅकेट वाटत आहेत. भाजीपाला विक्री केंद्राची व्यवस्था केली जात आहे. मोफत आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. रक्तदान शिबिर घेण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी रोजच्या रोज संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत. जेथे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते जावून तेथील नागरिकांना व रुग्णांच्या कुटुंबियांना आवश्यक त्या सोयी पुरवित आहेत. रुग्ण मिळालेल्या ठिकाणी, इमारतीत, परिसरात सॅनिटायझर फवारणी शिवसेनेमार्फत केली जात आहे.

प्रतिनिधी: विभागप्रमुखांकडून काही आदेश सूचना दिल्या जात आहेत का ?

सीताराम खांडेकर: हो. विभागप्रमूख रमेश कोरगांवकर हे विभागात लक्ष देवून आहेत व सातत्याने आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन करत आहेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मुलुंड विधानसभेची सामाजिक कार्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात चालू आहेत. शिवसेनेच्या गटप्रमुखांना धान्यवाटप करण्याचा आदेश विभागप्रमुखांनी सर्व शाखाप्रमुखाना दिला आहे. त्यानुसार शाखाप्रमूख संजय दळवी व शाखाप्रमूख आनंद पवार यांनी आपल्या गटप्रमुखांना धान्यवाटप केले आहे. विभागप्रमुखांच्या आदेशानुसार मुलुंडमधील सहा विभागात एमसीएचआई-बीजेएस यांच्या सौजन्याने शिवसेनेमार्फत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. आतपर्यंत विभागात सहा आरोग्य शिबिरे घेण्यात आली व साधारण २००० नागरिकांनी याचा लाभ घेतला. तसेच येणाऱ्या आठवड्यात देखील अनेक मोफत शिबिरे घेण्यात येणार आहेत व त्याचे शेड्यूल ठरले आहे.

प्रतिनिधी: गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्या सर्वांची वीडियो कान्फरेन्स झाली, असे समजले. काय चर्चा झाली त्यात ? काय आदेश दिला पक्षप्रमुखांनी ?

सीताराम खांडेकर: हो, खरे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी विभागप्रमुख आणि विभागातील सर्व उपविभाग प्रमुख, विधानसभा कार्यालय प्रमुख यांच्यासोबत वीडियो कान्फरेन्स घेतली. त्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक शाखेने सामाजिक कार्ये करण्याचे व नागरिकांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक शाखाप्रमुखांनी त्यांच्या विभागातील ५० वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना फोन करुन त्यांची खुशाली विचारणे, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेणे, त्यांना काही सामाजिक मदतीची आवश्यकता असेल तर ती देणे, तसेच त्यांना कोरोना संबंधित घ्यावयाची काळजी व शासकीय नियमांचे पालन करण्याच्या सूचना देणे व आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे सूचित करणे अश्या प्रकारचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वीडियो कॉन्फरन्समध्ये सर्व उपविभाग प्रमुखांना दिले आहेत व शिवसेना मुलुंड विधानसभा तर्फे तातडीने या कार्यास सुरुवात झाली असून आवश्यक ती माहिती घेवून जेष्ठ नागरिकांना फोन करुन त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

प्रतिनिधी: जिथे कोरोना रुग्ण आढळत आहे तेथे कशाप्रकारे सामाजिक कार्ये केली जात आहेत शिवसेना मुलुंड विधानसभेच्या माध्यमातून?

सीताराम खांडेकर: जेथे कोरोना रुग्ण आढळत आहेत तेथे पालिकेच्या पाठी लागून लगेच सॅनिटायझर फवारणी करुन घेण्यात येत आहेत. त्या इमारती परीसरात स्थानिक शाखाप्रमुख भेट देतात व इतर स्थानिक नागरिकांची चौकशी करतात. आवश्यक असेल किंवा तेथील रहिवाशांनी मागणी केली तर कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षेची साधने जसे की मास्क, सॅनिटायझर, इत्यादी उपलब्ध करुन दिले जाते.

प्रतिनिधी: सीताराम खांडेकरजी आपण आमच्याशी बोलून, शिवसेना मुलुंड विधानसभेमार्फत केल्या जात असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद…

सीताराम खांडेकर: आपल्याला देखील धन्यवाद…. काळजी घ्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुलुंड पश्चिम येथील विलगिकरण कक्षात तरुणीचा दुर्दैवी अंत

Next Post

मुलुंड जिमखानातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

Next Post
मुलुंड जिमखानातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

मुलुंड जिमखानातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d