Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या बैठकीत डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या बैठकीत डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

यावल तालुक्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकांच्या नुकसानी संदर्भात यावल येथे शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या बैठकीत शेतकऱ्यांसह युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

यावल-(प्रतिनिधी) – यावल-रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पिकांचे नुकसान करणे, साहित्याची चोरी यावर आळा घालण्यासंदर्भात मंगळवारी १५ मार्च रोजी यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली.


या वेळी शेतकऱ्यांच्या शेती नुकसानी बद्दल शेतकऱ्यांनी व डॉ. कुंदन फेगडे यांनी संताप व्यक्त केला. रावेर – यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांची नासाडी करणे, उभे पिक कापून नेणे, पीक कापून अथवा आग लावून जाळून टाकणे, शेतात गुरे चारणे, विद्युत पंप, विद्युत केबल्स चोरी या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. दोन दिवसापूर्वी येथील किशोर राणे यांचे शेतात बकऱ्या चराईस मनाई केल्यावरून राणे यांना बेदम मारहाण करत दुसरे दिवशी सुमारे ६ लाखाचे २ हजार केळीचे घड कापून नुकसान केले. तसेच तालुक्यातील चितोडा येथील दिनेश कुरकुरे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पेटवून देवून ५० हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे यावल तालुक्यातील शेतकरी संतापत झालेले आहे शेतकऱ्याच्या उभ्या पिकासह शेतीतील शेती साहित्याच्या चोऱ्या तसेच रात्रभर मोकाट गुरे शेतात चराईस सोडले जात असल्याने चहु बाजूने शेतक-यांची कोंडी करत नुकसान केले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बैठकीत शेतकऱ्यांनी व डॉ.कुंदन फेगडे यांनी व्यक्त करण्यात आल्या.

या दरम्यान, मोकाट गुरे मालक तसेच शेत पिकाचे नुकसान करणारे व शेत साहित्याची चोरी करणारे आढळून आल्यास त्यांचेवर कडक स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती डॉ.साहेबांनी पोलीस प्रशासनास केली. याप्रसंगी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, डॉ. कुंदन फेगडे, शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे, धिरज महाजन, हेमराज फेगडे, किशोर राणे, प्रमोद नेमाडे, कृष्णाजी पाटील, डीगंबर सावकारे, अट्रावलचे राजेन्द्र महाजन यांनी व्यथा मांडल्या. बैठकीस शहरासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

 “युद्ध नको” पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

भडगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या शिबिरास डॉ सचिन नांद्रे सरांची सदिच्छा भेट

Next Post
भडगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या शिबिरास डॉ सचिन नांद्रे सरांची सदिच्छा भेट

भडगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या शिबिरास डॉ सचिन नांद्रे सरांची सदिच्छा भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d