Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेती,व्यापार व उद्योगाबाबत देशाचे चित्र चिंताजनक – माजी कृषी मंत्री शरद पवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read

तापी शेतकरी सूतगिरणीचे चोपड्यात उद्घाटन

चोपडा – शेतकरी,कामगार व युवकांचा विकास करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी,कॅाग्रेस व शिवसेना हे पक्ष एकत्रीत आले आहेत.शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळावे अशी अपेक्षा आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्त्या देखील थांबतील. देशाचे शेती,व्यापार व उद्योगावर चिंताजनक चित्र आहे.देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे.मात्र अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची धोरणे पुरेशी नाहीत.ग्रामीण भागात वीज,पाणी,दळणवळण व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे आर्थिक विकास रखडला असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांनी येथे केले.

वेले ता.चोपडा शिवारातील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटन प्रसंगी खा.पवार बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील होते.
चोसाका भाडेतत्वावर देणे मला पटणारे
यावेळी खा.शरद पवार म्हणाले की,आर्थिक अडचणींमुळे व ऊसाच्या कमतरतेमुळे चोपडा शेतकरी साखर कारखाना बंद पडला आहे.त्याला सुरू करण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याची मागणी सगळ्यांनी माझ्याकडे केली.परंतु भाडे तत्व हे मला न पटणारे आहे.त्यापेक्षा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र बसून यथायोग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.कारखाना भाडेतत्वावर देणे म्हणजे शेतकरी व सभासदांना आपल्या हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील रस्त्यांच्या परिस्थितीवर टीका करतांना शरद पवार म्हणाले की,जळगाव अौरंगाबाद रस्ता इतका खराब झालाय की,त्यावरून यायचे म्हणजे एकतर डॅाक्टर सोबत पाहिजे किंवा अंग चेपणारा सोबत हवा.रस्त्यांचीही दुरावस्था थांबविण्याचे त्यांनी सांगितले.
हेलीपॅडवर स्वागत
दरम्यान माजी कृषी मंत्री शरद पवार, ना.दिलीप वळसे पाटील यांचे कला,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रांगणातील हेलीपॅडवर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, सूतगिरणी चेअरमन माजी आ.कैलास पाटील, कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, भाजप नेते घनःश्याम अग्रवाल,अमळनेरचे आ.अनिल पाटील आदिंनी स्वागत केले.यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सभागृहात अॅड.संदीप पाटील यांनी नेत्यांचे स्वागत केले.
सूतगिरणीत स्वागत व उद्घाटन
तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह नेत्यांचे आगमन झाल्यानंतर संचालिका जागृती बोरसे,रंजना नेवे,माधुरी सोनवणे यांनी त्याचे अौक्षण करून स्वागत केले.त्यानंतर सूतगिरणीचे कोनशिला अनावरण करुन व फित कापून शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमस्थळी नेत्यांचे आगमन झाल्यानंतर दिपपप्रज्वलन हस्ते खा शरद पवार,मंत्री वळसे पाटील व मान्यवरांचे हस्ते करुन समारंभाला सुरुवात करण्यात आली.खा.पवार यांचे स्वागत तालुक्यातील जेष्ठ नेते तसेच सूतगिरणीचे चेअरमन माजी आ.कैलास पाटील, व्हा.चेअरमन पी.बी.पाटील व संचालकांचे हस्ते करण्यात आले.तर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुतगिरणीचे पदाधिकाऱ्यांनी केले.

याप्रसंगी प्रास्तविक करतांना चेअरमन माजी आ.पाटील म्हणाले की,जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांची वाईट परिस्थिती आहे.त्यात आपणास लक्ष घालावे लागेल.९१ कोटींचा सूतगिरणी प्रकल्प सुरु व्हायला २७ वर्षे लागली.शेतकऱ्यांच्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी धुरा हाती घेतली.परंतु २५ हजार चात्यांची क्षमता पूर्ण होई पर्यंत उद्घाटन न करण्याचा आज मानस होता.त्यानुसार आज संपूर्ण क्षमतेने सूतगिरणी सुरु झाल्यामुळे पवार साहेबांसारख्या दूरदर्शी नेत्याच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद होत आहे.भविष्यात कापूसावर प्रक्रिया करीत एकाच परिसरात कापड निर्माण करण्याचा मानस आहे.
कार्यक्रमात सूतगिरणीचे पहिले मुख्य प्रवर्तक माजी आ.डॅा.सुरेश पाटील यांचा सत्कार खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच राष्ट्रपतींचे हस्ते नाईंटीगेल पुरस्कार प्राप्त आशाबाई गजरे यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी म्हणाले की, साखर कारखाना बंद असल्याने मनाला दुःख आहे.तर सूतगिरणी सुरू झाल्याचा आनंद आहे.चोसाका पवारांच्याहस्ते सुरु झाला होता.त्याचे १५ कोटींचे देणे पवार साहेबांनी परस्पर दिले.शरद पवारांनी तालुक्याच्या विकासाला नेहमी हातभार लावून उपकार केले आहेत.त्यांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास असून त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला.

राज्याचे कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील म्हणाले की,सद्यस्थितीत शेतकरी अडचणीत आहेत.उद्योग व देश मंदीत सापडला आहे.या मंदीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे सरकार प्रयत्न करते आहे. सूतगिरणी सर्वपक्षीय व अधिक चांगल्या पध्दतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करा.आम्ही आमच्या स्तरावर मदत करु अशी ग्वाही त्यांनी बोलतांना दिली.
यावेळी मंचावर शेतकरी संघटनेतर्फे शांताराम पाटील, इंदिराताई पाटील, जानकिराम पाटील, निवेदन सादर केले.
यावेळी मंचावर माजी मंत्री डॅा.सतीष पाटील, माजी आ.दिलीपराव सोनवणे,अमळनेरचे आ.अनिल पाटील,कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील,चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील, भाजपचे जेष्ठ नेते घनःश्याम अग्रवाल,शांताराम पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, जिल्हा बॅकेच्या माजी व्हा.चेअरमन इंदिराताई पाटील, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, प्रभाबेन गुजराथी, पं.स.सभापती कल्पना पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी,राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष विजया पाटील,नगर परिषदेचे गटनेते जीवन चौधरी,राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले.तर आभार सुतगिरणी संचालक के.डी.चौधरी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

Next Post

RTO सह शहर वाहतूक विभागाचे तहसीलदार यांच्या वाहनाकडे कानाडोळा?

Next Post
RTO सह शहर वाहतूक विभागाचे तहसीलदार यांच्या वाहनाकडे कानाडोळा?

RTO सह शहर वाहतूक विभागाचे तहसीलदार यांच्या वाहनाकडे कानाडोळा?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d