Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही भारताचे लोक” या विषयावर व्याख्यान संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही भारताचे लोक” या विषयावर व्याख्यान संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- येथील संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही भारताचे लोक या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवन येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक, विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

मी पणाने राष्ट्र तयार होत नाही, राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते. ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या दिवशी राष्ट्र मरण पावले. जाती मुळे मी पणा वाढीस लागतो म्हणून आम्ही भारताचे लोक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार हिच देशाची खरी ताकद आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी दैववादाला पराभूत केले आहे. मात्र संविधानाला हळद-कुंकू लावून दैवीकरण करण्याचा प्रयत्न अज्ञानातुनच केला जातो. मानवी कल्याण सांगणाऱ्या संविधाना बाबत साक्षरता होण्याची गरज आहे असे परखड विचार उत्तम कांबळे यांनी व्याख्यानातुन व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकूंदभाऊ सपकाळे यांनी केले.

विचार मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, प्रा.मिलिंद बागुल, अमोल कोल्हे, ईश्वर मोरे, किशोर सूर्यवंशी, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, भारत ससाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदन बिऱ्हाडे , जगदीश सपकाळे, महेंद्र केदारे, वाल्मिक सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, आकाश सपकाळे, बाबुराव वाघ, युवराज सुरवाडे आदिंनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंध व अपंग बांधवांना किराणा वाटप

Next Post

व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा – प्रा. डॉ.सत्यजीत साळवे

Next Post
व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा – प्रा. डॉ.सत्यजीत साळवे

व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा - प्रा. डॉ.सत्यजीत साळवे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d