Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सकाळी मागणी, दुपारी निधीचे पत्र आणि संध्याकाळी कामाचे भूमिपूजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सकाळी मागणी, दुपारी निधीचे पत्र आणि संध्याकाळी कामाचे भूमिपूजन

आमदार मंगेश चव्हाण यांच्या ऑन द स्पॉट कामाची ‘धडाकेबाज’ स्टाईल…

चाळीसगाव – ‘जो मे बोलता हु वो मै करता हु’ असे फिल्मी डायलॉग फक्त सिनेमांमध्ये हिरोच्या तोंडून ऐकायला भारी वाटतात मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव मात्र प्रेक्षकांना येत नाही. त्यात राजकारणी लोकांच्याबाबत तर बोलायलाच नको. मात्र याला अपवाद ठरेल असा अनुभव चाळीसगाव वासियांना वेळोवेळी येत असतो.
झालं काय तर चाळीसगाव शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणाऱ्या चौधरी समाजाची आहे.
या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे असल्याने सदर रस्ता दुरुस्तीची मागणी सदर शेतकरी बांधव गेल्या ४० वर्षांपासून करत होते. त्यातच मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व गुरा ढोरांचे त्याचप्रमाणे हातमजुरी करणाऱ्या मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले होते. हा त्रास सदर शेतकऱ्यांना दर पावसाळ्यात होत असल्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते.
ही सर्व अडचण घेऊन या त्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रमुख प्रतिनिधी सोबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांची दि.२९ मे रोजी सकाळी भेट घेतली व आपल्या स्थानिक विकास निधीतून डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली. आमदार मंगेशदादा यांनी देखील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समस्या समजून घेतली व त्यांना विचारले की किती निधी दिला तर हा रस्ता तयार होईल. त्यावर शेतकऱ्यांनी सांगितले की खडीकरण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जवळच उपलब्ध आहे तसेच हे काम आम्ही कुठल्याही आर्थिक दृष्टिकोन ठेवून न करता स्वतः उभे राहून करणार असल्याने शासनाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त आणि टिकाऊ काम आम्ही करून घेऊ कारण या रस्त्यावरच आमचे शेतीचे अर्थकारण अवलंबून आहे.
आमदार मंगेशदादा यांनीदेखील शेतकऱ्यांची प्रामाणिक तळमळ बघत आपल्या निधीतून तात्काळ ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले व तेव्हड्यावरच न थांबता काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे. शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना आता शेतात जास्त जावे लागणार आहे. त्यामुळे निधीचे पत्र दिल्यानंतर त्या कामाला मान्यता मिळण्यासाठी जवळपास एक ते दीड महिना लागेल, काम होईपर्यंत अर्धा पावसाळा निघून जाईल. म्हणून आमदार मंगेशदादा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार विजय चौधरी यांना बोलावून घेत त्यांना सदर कामाची जबाबदारी दिली व सांगितले की “तुम्ही आताच दुपारी माझ्या निधीचे ५ लाखांचे पत्र घ्या, तो निधी मंजूर होईल तेव्हा होईल, तुमचा कष्टाचा एक रुपया बुडणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो मात्र मला या शेतरस्त्याचे काम आजच संध्याकाळी सुरू झालेल पाहिजे. मी स्वतः संध्याकाळी तेथे नारळ फोडायला येतो.”
आमदार मंगेशदादा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तडकाफडकी घेतलेला निर्णय पाहून उपस्थित शेतकरी देखील भारावले.
ठेकेदार चौधरी यांनी देखील आनंदाने ही जबाबदारी स्वीकारत त्याचदिवशी संध्याकाळी कामाला सुरुवात केली.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील संपन्न झाले.
यावेळी जेष्ठ नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, नगरसेवक बापू अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सदानंदभाऊ चौधरी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अनिल ठाकरे चौधरी, अमोलदादा चौधरी, भाजपा कार्यकर्ते मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभु चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.
शेतकरी आंदोलन असो की, मध्यरात्री पाठलाग करून लाखोंचा गुटखा पकडणे असो आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपला स्वँगच वेगळा असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता विकासकामांच्या बाबतीत देखील सरकारी काम दहा महिने थांब न म्हणता, “द्यायचे तर द्यायचेच, बोललो तर बोललो” म्हणत
सकाळी मागणी, दुपारी निधीचे पत्र आणि संध्याकाळी कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केल्याने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज स्टाईलची चाळीसगावकराना अनुभूती दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

“सर्वांसाठी घरे -२०२२” या केंद्र शासनाच्या योजना राबविण्यात जळगांव जिल्ह्याचा ५ वा क्रमांक-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

Next Post
“सर्वांसाठी घरे -२०२२” या केंद्र शासनाच्या योजना राबविण्यात जळगांव जिल्ह्याचा ५ वा क्रमांक-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

"सर्वांसाठी घरे -२०२२" या केंद्र शासनाच्या योजना राबविण्यात जळगांव जिल्ह्याचा ५ वा क्रमांक-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d