Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन;अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2024
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन;अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

जळगाव-(प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव, शिक्षणाचा प्रवास, रमाबाईंसोबतचा विवाहप्रसंग, चवदार तळ्यासाठी केलेला महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, बाबासाहेब आणि संविधान, आम्ही भारताचे नागरिक संविधान अंगीकारत असल्याचा क्षण, बाबासाहेबांचे आर्थिक विकासाबाबात व शिक्षण आणि धर्माबाबतचे मानवता, बंधुत्व, समता यासाठी आपली कर्तव्य याबाबतचे विचार, संविधानाची महानता समानतेचा , स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, सांस्कृतिक व शैक्षणिकतेचा, धार्मिक स्वातंत्राचा, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, महिलांना सक्षमीकरणासाठीचे हिंदू कोड बिल यासह बाबासाहेबांचे जीवनाचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आदर्श समाज या विषयावर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण प्रदर्शित केले. यात नृत्य, वासुदेव, पिंगळा, भारुड, कीर्तन, पोवाडा,
नाटिका सादर केले. विक्रम वेताळ्याच्या गोष्टीतून बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखविला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला विभागातील विद्यार्थ्यांने बाबासाहेबाचे स्केच काढले.

छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर येथे झालेल्या फाऊंडर्स डे ची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अनुभूती स्कूलचे संस्थापक श्रध्देय भवरलाल जैन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, रश्मी लाहोटी, अनुभूती निवासी स्कूल चे प्राचार्य देबाशिस दास यांच्यासोबत माजी विद्यार्थी उपस्थित होते.

माजी विद्यार्थीनी रागिणी झंजारे हिने मनोगत व्यक्त केले. व्यक्तीमत्व विकासात अनुभूती स्कूलचे स्थान मोलाचे आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा कुटुंबाचा सहवासात आदर्श माणुस घडविण्याचा शिकवण मिळाली.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

क्रीडा, शैक्षणिक, नृत्य यासह विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या अनुभूती इंग्लिश मिडीयम प्रायमरी व सेकंडरी स्कूल च्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रागिणी मधुकर झंजारे, पियूष वासुदेव राणे, यश शेखर शिंदे, धनश्री दत्तात्रय झिरमारे, मुकुंद शिवदा चौधरी, अश्विनी समाधान वरसोळे, मयूरी महाले, घोषीता पाटील, प्रतिक चंद्रशेखर सपकाळे, रुद्राक्ष माळी, शैलेश दीपक गोरे यांचा समावेश होता तसेच कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हेपेटायटिस बी लसीकरण उपक्रम

Next Post

गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून तयारीचा घेतला आढावा;अजय-अतुल यांच्या कार्यक्रमाची पर्वणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d