जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक ०५/०५/२०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. जिल्हा जळगाव व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने; क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त दिनांक ०७ एप्रिल ते १४ एप्रिल “सामाजिक समता सप्ताह” चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुरूवातीला; कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण व अभिवादन केले. सर्व अतिथी व प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर; श्री. युनुस तडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. आर.डी.पवार सर [वरीष्ठ समाजकल्याण निरीक्षक सा.न्या.विभाग जळगाव], यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सामाजिक समता कार्यक्रमाबाबत बार्टी तर्फे खुप छान नियोजन आले असून समतादूतांनी अतिशय छान व मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घ्यावे व महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीनेही कार्यक्रम आयोजन आले कि त्यात सहभागी व्हावे असे आवाहन हि केले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा.श्री. वाणी सर [ कार्यालयीन अधिक्षक, सा.न्या. विभाग जळगाव], यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे: मा.श्री. राहुल इधे सर [सहा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा DRDA जळगाव] यांनी स्वयंसहाय्यता युवा गट स्थापन व बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते: मा.श्री. किरण महाजन सर [जिल्हा व्यवस्थापन, सामाजिक समावेशक व संस्था बांधणी DRDA जळगाव] यांनी स्वयं सहाय्यता युवा गट बांधणी व त्यांची उत्पन्नाची साधने, उद्योजकता, स्वयंरोजगार, विविध डिप्लोमा कोर्सेस, रोजगाराभिमुख व्यवसाय आणि वित्तपुरवठा याबाबत सखोल माहिती देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते: मा.श्री. विजय सैंदाणे सर [सहा. प्रकल्प समन्वयक जिल्हा उद्योग केंद्र DIC जळगाव] यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, २८ विविध प्रशिक्षण कार्यशाळा, व्यावसायीक दृष्टीकोनातून आर्थिक मदत व कर्ज सुविधा तसेच प्रधानमंत्री/मुख्यमंत्री उद्योजक कर्ज सहाय्य योजना आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाचा प्रत्यक्ष लाभ व पुरेपूर सहकार्य आपण स्वयं सहाय्यता युवा गटांना व समतादूतांना करू असे आश्वासन देत मार्गदर्शन केले.

जिल्हा प्रकल्पाकडून दिनांक ०७ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक समता प्रबोधन कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावरील व्याख्यानमाला, १३ एप्रिल सामुदायिक १० तास पुस्तक वाचन कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रम जिल्हा व तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे अशी माहिती उद्घाटन प्रसंगी समतादूत प्रकल्प अधिकारी यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत कल्पना बेलसरे व आभार समतादूत शिल्पा मालपूरे यांनी मानले.

सदरील कार्यक्रमास समतादूत शांताराम हटकर, समतादूत सरला गाढे, समतादूत सविता चिमकर, समतादूत अर्चना किरोते, समतादूत स्नेहा बोरसे, सर्व तालुका समतादूत व सर्व तालुका समन्वयक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.










