Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

१५ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना ई- पिक पाहणीची नोंद करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ई-पिक पाहणी नसेल तर सरकारची मदत मिळणे अवघड , १ ऑगस्टपासून नोंदणी सुरु

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/08/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
१५ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना ई- पिक पाहणीची नोंद करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

जळगाव दि. 2 ( जिमाका ) : आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. १ ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.

 

१५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी अॅपद्वारे खरिपातील पिकांची नोंद करून घ्यावी. राज्य शासनाकडून २०२१ पासून ई- पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद अॅपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता. परंतु, नंतरच्या दोन वर्षानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई- पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे. यंदा देखील ई-पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. १ऑगस्टपासून शेतकऱ्यांना अॅपवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा
जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंद करू शकतील.
यानंतर तलाठी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येईल. यासाठी १५ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असणार आहे.

 

 

ई-पीक पाहणीचे महत्व
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते. परंतु, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. अशाच शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्यांकडून देखील ई- पीक पाहणीचा अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येते. यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई-पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरवण्यात येते.
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदणी करता येईल. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

Next Post

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d