Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

३० मे २०२१ रोजी जाहीर आदेशासंबंधी अतिरिक्त स्पष्टीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2021
in राज्य
Reading Time: 3 mins read
३० मे २०२१ रोजी जाहीर आदेशासंबंधी अतिरिक्त स्पष्टीकरण

३० मे २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशाच्या संदर्भात काही स्पष्टीकरण खाली देत आहोत:-

प्रश्न १: कोविड निर्बंधांसाठी प्रशासकीय घटक (महानगरपालिका किंवा जिल्ह्याचा इतर भाग) क, ड किंवा ई या पैकी कोणत्या श्रेणीत असावे हे कोण ठरवते?

उत्तर:- हे निर्णय जिल्हा व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) घेते आणि तात्काळ त्याची घोषणा करते. यानंतर वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांसाठी तिथल्या आवश्यकतेनुसार सदर मापदंड ठरवले जातील.

प्रश्न २– जर एखाद्या महानगरपालिका पालिका क्षेत्र किंवा (जिल्ह्यातील इतर भाग) येथील पॉझिटिव्हिटी दर किंवा भरलेले ऑक्सिजन बेडचीसंख्या याच्यात बदल होत असेल तर?

उत्तर:- सदर मार्गदर्शक तत्वे 29 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशांसाठी लागू असेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे भरलेले ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्हिटी दर याचा साप्ताहिक आढावा घेतील, बहुदा शुक्रवारी, जेणेकरून येणाऱ्या सोमवार पासून सदर बद्दल करून त्यांची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल.

पॉझिटिव्हिटी दर जर अशा प्रकारे बदलत असेल की, तेथील निर्बंधांना शिथील करावे लागेल, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सदर तरतूद 30 मे 2021 रोजी दिलेल्या ‘ब्रेक द चेन’ आदेशाच्या अधीन राहून लागू करू शकते परंतु त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एस डी एम ए) कडून परवानगी घ्यावी लागेल.

जर पॉझिटिव्हिटी दर आणि भरलेले ऑक्सिजन बेडची ची टक्केवारी अशाप्रकारे बदलत असेल की, तिथे निर्बंध जास्त कडक करण्याची आवश्यकता भासत असेल, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एस डी एम ए ला या संबंधी माहिती देऊन निर्बंध आणखी कठोर करू शकते.

प्रश्न ३:- ऑक्सिजन बेडची टक्केवारी काढताना व्हेंटिलेटर बेड/आयसीयू बेड यांची संख्या ही त्यात अंतर्भूत असेल का?

उत्तर:- हॉस्पिटल किंवा वैद्यकीय सुविधा असलेल्या ठिकाणी कोणतेही बेड की ज्याच्याशी ऑक्सिजन पुरवठा संलग्न असेल किंवा त्याची तरतूद असेल, त्यांना ऑक्सिजन बेड म्हणूनच गणले जाईल.

प्रश्न ४:- 30 मे 2021 रोजी प्रकाशित केलेल्या आदेशात समाविष्ट नसलेल्या सलून/स्पा/जिम व इतर गैर –आवश्यक आस्थापनांबाबत काय?

उत्तर:- १२ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेश अशा ठिकाणी अंमलात असेल.

प्रश्न ५:- जिल्ह्याबाहेरील किंवा राज्य बाहेरील लोक जर एखाद्या जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वरती असतील तर त्या ऑक्सिजन बेडला ‘भरलेला’ म्हणून गृहीत धरावे का?

उत्तर:- सर्व ऑक्सिजन बेड मग ते कोणत्याही व्यक्तीने भरलेले असोत, त्यांना ‘भरलेले ऑक्सिजन बेड’ म्हणूनच गणले जाईल.

प्रश्न ६:- जीआरई, जीएमएटी, टीओईएफएल, आयईएलटीएस परीक्षांबद्दल काय?

उत्तर:- कोणत्याही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ये-जा करताना त्यांच्यासोबत एका सज्ञान व्यक्तीस परवानगी असेल. हॉल तिकीट किंवा इतर कोणतेही दस्तावेज यांना प्रवासासाठी वैद्य गृहीत धरण्यात येईल.

प्रश्न ७:- नागरिकांच्या जिल्हा प्रवासाबद्दल काय?

उत्तर:- जर सदर प्रवास एखाद्या अशा प्रशासकीय घटकासाठी किंवा घटकातून होत असेल की, जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दर आहे आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, तेथे प्रवास करण्यासाठी परवानगी मिळणार नाही. फक्त कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक आणीबाणीच्या प्रसंगी सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

उपरोक्त प्रशासकीय घटकांत व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांसाठी 12 मे 2021 ला जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे निर्बंध /परवानगी च्या अटी-शर्ती लागू असतील. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदर्श विद्यालय कानळदा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपन्न

Next Post

जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर;जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश

Next Post

जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर;जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d