Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेबाबत मार्गदर्शक सुचना जाहिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका) दि. 13 – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 7 नुसार, 15 ऑगस्ट, 2021 रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र सद्य:स्थितीत कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपायोजना राबविण्याकामी शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक ते निर्बंध लागू करण्यात आलेले आहे.


शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 11 ऑगस्ट, 2021 रोजीचे ‘ब्रेक द चेन’ सुधारीत मार्गदर्शक सूचना आदेशान्वये कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.

ही बाब लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी वैधनिक सभेचे/ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत नागरिकांची अनावश्यकरित्या गर्दी होण्याची शक्यता आहे. याकरीता अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी मार्गदर्शक सुचना जाहिर केल्या आहेत.


त्याअनुषंगाने ग्रामसभा या ऑफलाईन घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन व्यवस्था देखील करण्यात यावी. 200 पर्यंत ग्रामस्थ ऑफलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. मात्र त्यापुढील ग्रामस्थ ऑनलाईन पध्दतीने सहभागी होतील. या ग्रामसभांमध्ये पोकरा (POCRA) (लागू असलेल्या गावांसाठी), जातीवाचक गावांची व रस्त्यांची नावे बदलणे आदि शासनाकडील प्राथम्याचे विषय चर्चेत घ्यावेत.


ग्रामसभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील. तसेच ग्रामसभेच्या प्रवेशाच्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे थर्मल गनच्या सहाय्याने तापमान मोजणे व सदर ठिकाणी निर्जतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकाची राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Next Post

कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post
कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d