<
जळगाव – (प्रतिनिधी) – जगात व देशात विषारी कोरोना व्हायरस मुळे हाहाकार पसरलेलला आहे. संपूर्ण जग ह्या महामारी शि लढा देत आहे. आपल्या देशाला देखील ह्या विषारी कोरोना व्हायरस ने घेरले आहे. ह्या कोरोना व्हायरस शी लढाई लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्ण ताकतीने लढत आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ह्या लढाईत सहभागी आहे. केंद्र व राज्य सरकारने आता 3 मे पर्यत लॉक डाऊन केले आहे. 25 मार्च संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. ह्या लॉक डाऊन मध्ये देशातील सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे केंद्र व राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. ह्यात गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग 25 मार्च पासून घरीच आहे. त्यांच्या जवळ असलेले थोडेफार पैसे काटकसरीने खर्च करीत आहे. काही लोकांजवळील किराणा संपला आहे. गोरगरीब कष्टकरी कामगार उपाशी राहू नये म्हणून, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम 230 कुटूंबाचा किराणा घेऊन जळगाव शहरातील विविध भागांतील 230 कुटूंबाना विजय निकम यांच्या सहकार्य ह्या 230 कुटूंबाच्या घरी जाऊन माणुसकीच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात पुढे केला आहे. याआधी विजय निकम यांनी 600 लोकांना जेवणाचे पाकीट व 200 कुटूंबाना ८ दिवसाचा किराणा दिला आहे. ह्या मदतीने गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाने विजय निकम यांचे आभार मानले.