<
जळगाव,(प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील वनोली येथील अंबादास धनसिंग पाटील यांचे स्वस्त धान्य दुकान क्र.79 चे प्राधिकारपत्र रद्द रद्द केले असल्याचे आदेश जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी आज दिनांक 27 रोजी काढले.
याबाबत थोडक्यात असे की
वनोली येथील अंबादास धनसिंग पाटील यांचे स्वस्त धान्य दुकान क्र.79 बाबत लाभार्थ्यांना धान्य साठ्यापेक्षा धान्य कमी देणे, लाभार्थ्यांचे यादीत ऑनलाईन नाव असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे, लाभार्थ्यांशी अरेरावी भाषा वापरणे अशा तक्रारी होत्या.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानांबाबत नेमण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीस देखील धान्य वितरण गैरकारभार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत तहसीलदार यांनी चौकशी व सुनावणी घेऊन करून जिल्हापुरवठा अधिकारी यांच्याकडे सदर दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याबाबत अहवाल सादर केला होता.त्या अनुसार जिल्हापुरवठा अधिकारीसुनील सूर्यवंशी यांनी आज सदर स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द केल्याचे आदेश दिले आहे.