<
दिनांक:२७ एप्रिल २०२०, मुंबई प्रतिनिधी,
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला. किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या वेशात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढवला. महापौरांनी फेसबुक पेज वर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधीही नर्स म्हणून काम केलं आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी आज संवाद साधला. कोरोनाच्या पार्शवभूमीवर कित्येक डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या जीवाची व परिवाराची काळजी न करता अहोरात्र सेवा प्रदान करत आहेत. म्हणूनच सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
‘मुंबईकरांसाठी काहीपण, आम्ही घरातून काम करू शकत नाही, आम्ही तुमच्यासाठी मैदानात उतरलो आहोत. तुम्ही आपापल्या घरी राहा व काळजी घ्या’ असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जनतेला केलं आहे.