<
कोरोना महामारीने जागतिक पातळीवर थैमान घातले असल्यामुळे याचा थेट परिणाम हा सर्व सामान्य लोकांच्या जीवनावर झाला , ज्यात सर्वच वयोगटातील लोकांना वेगवगळ्या प्रश्नांना समोरे जावे लागत आहे . कारण भारत सरकारने देशभरात लॉकडाउन जाहिर केल्यानंतर सर्व लोक आप आपल्या घरात बंदिस्त झाले आहेत , व त्यांची दैनंदिन दिनक्रीया बन्द झाली , जेणेकरुन हा आजार पसरू नये , परन्तु कोरोना आजारचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याचा प्रादुर्भाव लहान मुलांना होण्यची शक्यता जास्त आहे , कारण त्यांची रोगप्रतिकार करण्याची क्षमता इतरांपेक्षा कमी असते .
अशा परिस्थितीत आपण जर समाजातील मुलांचा विचार केला तर , हा घटक सर्वात जास्त वलनेरबल आणि मार्जिनल आहे , म्हणून आपली मुले कोणत्या मानसिकतेतून जात असतील याचा आपल्याला अंदाज येतो . कारण मुलांना सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत त्यांचे स्वताचे वेळापत्रक असते , ज्यात या मुलांचे वेळ निघुन जात असे , परन्तु आता सर्वच लोक बंदिस्त असल्याने त्यांना बाहेर जाता येत नाही. अशातच सर्वात जास्त परिणाम मुलांच्या मनावर झाल्याचे निदर्शनात येत आहे. कारण ही मुले घरी बन्दिस्त झाल्याने चिडचिडी झाली आहेत , त्यांना राग पट्कन येवू लागला आहे, त्यांचा स्वभावात आणि वर्तणुकीत बदल घडत आहे , आपण जर समाजातील सर्व साधारण मुलांचा विचार केला तर , या मुलांना किमान आपल्या मनातील गोष्टी व भावना घरातील लोकांना सांगता येते , जेणेकरुन या मुलांना काही प्रमाणात आपल्या मनाप्रमाने वागता येते , स्वताला व्यक्त करता येते , आपले मत किंवा विचार मांडता येते , ज्यामुळे घरातील पालकांना त्यांची मानसिकता समजून घेता येते .
म्हणूनच भारत सरकारने बाल हक्क संहिता पारित करून सर्व बालकांचे अधिकार जपाण्यास आपण कटिबद्ध अशी भूमिका घेतली आहे , जेणेकरून प्रत्येक मुलांना त्यांचे बालपण जगात येईल आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून ते दूर राहतील , म्हणूनच आपल्या देशात बालहक्क चळवळ सुरू झाली , ज्याचा परिणाम म्हणून देशभरात मुलांसाठी बाल न्याय अधिनियम , पोस्कॉ कायदा , बाल कामगार निर्मूलन कायदा यासारखे अनेक वेगवेगळे कायदे निर्माण करण्यात आले , जेणेकरून मुलांचे संरक्षण करता येईल आणि त्यांना आपले अधिकार बजावता येईल , म्हणूनच त्यात प्रत्येक मूल हे विशेष व स्वतंत्र घटक आहे हे तत्व आपण मान्य केले , कारण मुलांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही मोठ्या लोकांची आणि समाजाची आहे , परन्तु ज्या मुलांना समाजातून वेगळे करण्यात आले व अशा मुलांची रवानगी काही कारणास्तव बालगृहात , कारागृहात , शेल्टरमधे करण्यात आली , त्या सर्व मुलांच्या मानसिकतेवर या लॉकडाउनचे सामाजिक , मानसिक , शारिरीक आणि भावनिक काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास आणि विचार होणे गरजेचे आहे , कारण आपण आता अपवादात्मक परिस्थितीत जगत आहोत , तर ही मुले कोणत्या संघर्षाचा सामना करत असतील हे आपण समजुन घेतले पाहिजे .
कारण लॉकडाउन पुर्वी या सर्व मुलांना किमान वेगवगळ्या गोष्टीत व कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत असत , ज्यात त्यांना स्वतःच्या कलागुणांना व एकन्दरीत त्यांचात बाल विकास होण्यास मदत होईल अशी संधी त्यांना मिळत असे , तसेच या मुलांची भेट घेण्याकरिता महीन्यातून एकदा त्यांचे पालक किंवा सामाजिक कार्यकर्ता जात असे , ज्यामुळे त्यांचे भावनिक व सामाजिक नातेसंबध सकारात्मक अणि सद्दृढ असे , ज्यात ते मुलांचे भावविश्व समजून घेत असे , परन्तु आता या परिस्तिती मुलाखत घेणे किंवा गळाभेट घेणे शक्य होत नसल्याने मुलांच्या मनावर नकारात्मक भावना निर्माण होवू शकते , ज्यामुळे मुलांमधे चुकीचे भावना किंवा न्यूनगंड निर्माण होवुन त्यांना चुकीचे विचार व भावनांना समोरे जावे लागले .
म्हणून बाल हक्कांसाठी काम करणार्या संस्थांनी यासाठी प्रयत्न करुन पुढाकार घेतला पाहिजे , जेणेकरुन मुलांचे सर्व बाल अधिकार अबाधित रहातील , तसेच सरकारने अणि प्रशासनाने ही विशेष बाब म्हणून लक्षात घेवुन या सर्व बन्दिस्त मुलांना वेळोवेळी मानसिक समुपदेशन व सामाजिक मदत कशा प्रकारे पुरविता येइल , याचा खास विचार करुन सर्वसमावेशक निर्णय आणि भूमिका घेतली पाहिजे , जेणेकरुन या मुलांचे बाल हक्क अबाधित रहातील आणि मुले आनंदी जिवन जगू शकतील . कारण देशात अणि राज्यात अजुन किती काळ ही परिस्थिती राहिल हे सांगता येणार नाही, म्हणून सरकारने यावर तातडीने उपाय योजना आखली पाहिजे, जेणेकरुन आपल्याला मुलांचे बालपण आणि हक्क सुरक्षित राखता येइल .
आपली ,
रीना जैस्वार .
( BA/MSW )
सामाजिक कार्यकर्ती
प्रयास संस्था (टिस प्रकल्प )
M – 8655926795.