<
जिल्ह्यात कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 22 झाली.
जळगाव – (जिमाका) – आज आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील तीन तर जळगाव मधील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश.
बाधित चार रुग्णांमध्ये 3 पुरुष तर एक महिलेचा समावेश.
आज आढळून आलेल्या
बाधित चार रूग्णांपैकी दोन रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रूग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रूग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रूग्ण भुसावळ येथील आहे.
जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले.
यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित 22 रूग्णांपैकी सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे