जळगाव,(विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 22 झाली असून जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 7 बळी गेले आहे.यामुळे खान्देशात कोरोना बळीच्या संख्येत धुळे, नंदुरबार जिल्ह्याला देखील मागे टाकल्या गेले आहे.आतापर्यंत धुकाल रात्री आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील एक डॉक्टर आहे तर दोन पंचचशील नगरातील आहे.पॉझिटिव्ह आढळून आलेल्या भुसावळ येथील महिला रुग्णावर उपचार केल्याचे समोर आले आहे. भुसावळ येथे सापडलेल्या कोरोना बाधितांचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. येथे 4 तर नंदुरबार येथे 1 रुग्णांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याची डोकेदुखी वाढली आहे.
काल रात्री आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील एक डॉक्टर आहे तर दोन पंचचशील नगरातील आहे.पॉझिटिव्ह आढळून आलेल्या भुसावळ येथील महिला रुग्णावर उपचार केल्याचे समोर आले आहे. भुसावळ येथे सापडलेल्या कोरोना बाधितांचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
जळगाव शहरात तब्बल 28 दिवसा नंतर आढळला कोरोना रुग्ण
तर जळगाव मधील जोशी पेठेतील एका रुग्णाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जळगाव शहरात तब्बल 28 दिवसा नंतर कोरोना रुग्ण आढळला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.जोशी पेठ मध्ये सापडलेल्या रुग्णावर जळगाव कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.