<
पाचोरा :- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाच्या चालीरीती बदलल्या असून महाराष्ट्रातील खानदेशात विवाह सोहळ्यावर भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या मराठा समाजातील आदर्शव्रती कुटुंबांनी कोरोना आजाराच्या कालखंडात आदर्श पद्धतीने विवाह सोहळा साजरा केल्याने महाराष्ट्रात एक नवा आदर्श पायंडा घालून दिला आहे.
सामनेर ता पाचोरा येथील श्री. हिरामण सांडु पाटिल यांची सुकन्या चि. सौ.का.प्रियंका व वाड़ी ता.पाचोरा येथील श्री. शांताराम पाटिल यांचे सुपुत्र चि. प्रवीण या दोघंचा आदर्श विवाह वाड़ी ता पाचोरा येथे दि.२७/०४/२०२० सोमवार रोजी निसर्गाच्या सनिध्यात खुल्या आणी मोकल्या नभोमंडपात अर्थातच वाडी (शेवाळे)येथील वरपित्याच्या घरावरील गच्चीवर अत्यंत साधेपणाने संपन्न झाला. ग्रामस्थ व नातलगांचे प्रतिनिधी म्हणून वाड़ी गावाच्या सरपंच सौ.शोबाबाई भीकन पाटिल व पोलीस पाटिल श्री.संजय बाबूराव पाटिल हे दोघे प्रतिष्ठित यावेळी उपस्थित होते. गल्लीतिल गावातील लोकांनी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत आप आपल्या घरातील छत व खिड़कीतुन टाळया वाजवुन वधुवरांना शुभआशीर्वाद दिलेत, याशिवाय नातेवाईक मंडळीने वधुवरांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्यात.
विशेष म्हणजे हा विवाह सोहळा अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पार पाडावा हे वधु-वर या दोन्ही कडिल मंड़ळिचा पूर्वनियोजित संकल्प होताच , त्याला लॉकडाउन निमित्तमात्र झाले. कमी खर्चात व कमी श्रमात धार्मिक पावित्र्य जपून विवाह सोपस्कर पूर्ण केल्याने या विवाहाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
पारंपारिक विवाह पद्धतीत कालानुरूप फार मोठा बडेजाव आल्याने अनावश्यक पैसा खर्च होऊन वर व वधू पक्षाकडील मंडळींना अतिश्रम , शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. विवाह सोहळ्यातील संपत्ती व पैशाचे प्रदर्शन आणि प्रतिष्ठेच्या हव्यासामुळे होणारा बेसुमार खर्च, धावपळ व इतर त्रास यामुळे कमी झाला . चालीरीप्रमाणे लगनपत्रीका वाटप करत असताना बऱ्याच अपघाती घटना घडतात व त्यात लग्नचा बेरंग होतो. कित्येकाना तर आयुष्यभरासाठी अपंगत्वरूपी कटु आठवणी बोचत असतात . घोड़ा,गाड़ी, मंडप,बैंडचा अवाक्या बहेरिल खर्च वाचला. वधु-वर,दोन वरमाला व दोन साक्षीदारआणि एक भटजी एवढ्या फक्त 5 लोकांच्या उपस्तिथीत एकाच दिवसात साखरपुड़ा,हळद व मंत्रोच्चाराने विवाहबंधन पूर्ण झाले. श्री योगेश रावण पाटिल व सौ.सुवर्णा योगेश पाटिल या एकाच जोड़प्याने परम्परे नुसार वधुवर या दोघाना हळद लावली त्यानंतर लगेच विवाह संपन्न झाला. वधू पित्याकडून कन्या च्या लग्नासाठी दिले जाणारे स्त्रीधन यातून पाच हजार शंभर रुपये कोरोंनारुपी शत्रुशि लढ़न्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधित जमा करण्याचा संकल्प वधुवरानी केला. असा आदर्श सर्व विवाहइछुक वधुवरानी अंगीकारवा असे खानदेश कुनबी मराठा वधुवर गृपचे संस्थापक अध्यक्ष श्री बापूसाहेब सुमित पाटिल यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनहितार्थ आव्हान सुद्धा केले.
विधात्याने निर्मिलेल्या नभमंडपाखाली,ब्राह्मणसाक्षीने, मंत्रोच्चाराच्या ध्वनीलहरित, निसर्गसानिध्यात बांधलेली ही रेशीमगाठ उभयतांच्या आठवणीतली तर समाजासाठी प्रेरणादायी ठरली यात शंका नाही.