जळगाव – पाचोरा येथील 56 वर्षीय पुरुष कोरोना संशयित रुग्णाचा आज जळगाव येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत डॉ.खैरे यांनी माहिती दिली.
सदर व्यक्ती पाचोरा येथील भीमनगर येथील रहिवासी असून रुग्णाचे कोरोना तपासणी साठी अहवाल पाठवण्यात आला आहे. मात्र रिपोर्ट अद्याप प्रशासनाला प्राप्त नसल्याचे कोविड रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.