<
म्हसावद कृषि उत्पन्न बाजार समितीतील गैरप्रकार
म्हसावद-प्रतिनिधी-एस. पी. सुरवाडे
येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून व्यापाऱ्यांकडून त्यांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा गैरप्रकार व्यापाऱ्यांकडून होत असून व्यापारी मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून होत आहेत. म्हसावद पंचक्रोशीतील शेतकरी दादर, मका, बाजारी, गहु या मालाची विक्री करण्यासाठी बाजार समितीमध्ये दाखल होत आहेंत. शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. मात्र याची अमलबजावणी होत नसल्याची माहिती समोर येत आहे.