जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदत संपलेल्या भडगाव व वरणगाव नगरपरिषदवर प्रशासक नियुक्त केल्याचे आदेश दि.28 रोजी शासनाने काढले आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. आता देखील मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे शक्य नसल्याने ना नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. भडगाव नगर परिषदेचा कार्यकाळ 29 एप्रिल तर वरणगाव नगरपरिषद चा कार्यकाळ 5 जून रोजी संपत आहे. या नागरपरिषदेवर त्या त्या प्रांतअधिकारी यांना प्रशासक म्हणून काम पाहावे लागणार आहे.
वरणगाव नगरपरिषद चा कार्यकाळ 5 जून ला संपत आहे.तो पर्यंत निवडणूक न झाल्यास प्रशासक बसेल आताच बसणार नाही अजून महिन्या भराचा अवधी आहे असे वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सत्यमेव जयते शी बोलतांना सांगितले.