<
कळंब, तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कोरोना व्हायरसने जगासह देशभरात धुमाकूळ घातलाय. या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सरकार कडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कळंब मधील महाविद्यालयामध्ये जिथे विद्यार्थ्याद्वारे कोरोना विषयी जनजागृती केली जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबच्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने विद्यार्थ्याना ऑनलाईन covid 19 awarness program याद्वारे प्रश्नोत्तरे देवून जनजागृती करण्याचं काम केलं आहे.
सध्या कोरोनाच्या सावटामुळे ऐन परिक्षेच्या दिवसांत महाविद्यालय बंद ठेवण्यात आले मात्र महाविद्यालयाला सुट्टी जाहीर झाली तरी कळंबच्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. सौ. अर्चना मुखेडकर (वनस्पतीशास्त्र विभाग) व डॉ.हेमंत चांदोरे (फलोत्पादन विभाग) या प्राध्यापकांनी ऑनलाइन शिक्षणाचा नवा पर्याय शोधून शिक्षण पद्धतीत नवा पायंडा पाडलाय.
कोरोना जनजागृती (covid-19 awareness program) या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी घरी राहून ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवत आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.