<
१२ जणांना अटक ; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव :- शहरातील मयूर कॉलनीत राहणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाच्या घरात जुगार अड्डा सुरु असल्याच्या माहितीवरून उपाधीक्षक निलाभ रोहण यांच्या पथकाने उधळून लावत १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता पोलीस उपअधीक्षकांनी छापा टाकला. या कारवाईत नगरसेवकासह बारा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन १२ मोबाईल, तीन दुचाकींसह एकुण २ लाख ७४ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते .
यांनी केली कारवाई
पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनी येथे कुलभूषण पाटील यांच्या नवीन घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी किरण धमके सुनील पाटील, राजेश चौधरी रवींद्र मोतीराया, अशोक फुसे सचिन साळुंके ,विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांना सोबत घेत छापा टाकला.
यांना घेतले ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी संतोष बारी, रुघुनाथ पाटील, समाधान चौधरी, पंकज पाटील, सचिन पाटील नीलेश कोळी, धिरज पाटील, राजेंद्र भोई, मंगेश पाटील, पंकज पाटील, कुणाल रामसे व अनिल गव्हाळे यांना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलभूषण पाटील यांच्या ताब्यातील घर असल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी सांगितले. सर्व संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले .