<
स्वच्छ भारत मिशन(ग्रा) गावपातळीवरील स्वच्छाग्रही करणार प्रबोधन
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना म्हणजेच कोविड-१९ च्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या राज्यात जळगांव जिल्हा हा रेड झोन मध्ये अडकला असून कोरोना बाधित मृत व संशयीतांची संख्या जिल्हा भरात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे नियुक्त करण्यात आलेले गावपातळीवरील स्वच्छग्राही मार्फत जिल्हाभरात कोविड-१९ बद्दल जनजागृती केली जाणार आहे. पाणी व स्वच्छता विभाग मिशन(ग्रा) तर्फे गावपातळीवर स्वच्छग्राही नियुक्त करण्यात आले आहे. विशेषतः शौचालय बांधून त्याचा वापर करणे व स्वच्छता विषयी लाभार्थ्यांना प्रेरित करण्याचे काम स्वच्छाग्रही करीत असतात परंतु सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व जिल्ह्याची रेड झोन मधील वाटचाल पाहता तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग होणे हे स्वछतेशी निगडित असल्यामुळे प्रबोधनसाठी स्वच्छग्राहींची मदत घेतली जाणार आहे. विशेषतः चेहऱ्यावर मास्क लावणे, साबण किंवा सॅनिटायझर ने हात स्वच्छ करणे, शारीरिक अंतर 3-4 फूट ठेवणे, कोरोना विषयी लोकांच्या मनात असलेली भीत दूर करणे इ. विषयक स्वच्छग्राही गावपातळीवर जनजागृती करणार आहेत. यासाठी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था बेलापूर, नवी मुंबई यांच्या दिलेल्या निदर्शनानुसार दि. ३०/४/२०२० ते १/५/२०२० पर्यंत स्वच्छग्राहींचे ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तरावरून प्रशिक्षण घेण्यात येणार असून गट समन्व्यक व समूह समन्व्यक यांच्याद्वारे प्रत्यक्ष रीतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत आज २८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत ऑनलाईन व भ्रमणध्वनी द्वारे प्रशिक्षणाचे नियोजन करण्याबाबत सूचना गटविकास अधिकारी, गट समन्व्यक व समूह समन्व्यक यांना देण्यात आल्या आहे.