<
भुसावळात खासदार रक्षाताई खडसे यांच्यातर्फे PPE किट्स व सॕनिटायझरचे वाटप
भुसावळ-(प्रतिनिधी) – शहरात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर आज सायंकाळी 5 वाजता शहरातील नगरपालिका दवाखाना,सर्व पोलिस स्टेशन आणि प्रांताधिकारी कार्यालय तसेच शहरातील इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये आणी मोठ्यां दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकरिता रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांच्यातर्फे 200 PPE किट्स,3000 मास्क आणि 5 लिटरच्या 10 बाॕटल सॕनिटायझरचे वितरण करण्यात आले.
आज झालेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या चर्चेतून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी उद्या रात्रीपासून 3 दिवस स्वयंस्फूतीने कडकडीत बंद पाळावा असे आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केले आहे. या तीन दिवसात फक्त दवाखाने व मेडिकल सेवा सुरु राहतील अशी माहीती आज आमदार संजयभाऊ सावकारे यांनी दिली आहे.आज झालेल्या कार्यक्रमाला रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे,आमदार संजयभाऊ सावकारे,नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश महाजन भाजपा शहर सरचिटणीस पवन बुदेंले आणि मोजके भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून पीपीई किट्स , सॕनिटायझर व इतर वैद्यकिय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भुसावळ शहरात कोरोना संक्रमणाची संख्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम कमीत कमी संख्येत केला गेला. भुसावळ शहर वासियांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लाॕकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे शक्यतो घरीच राहावे असे आवाहन आमदार संजयभाऊ सावकारे यांनी केले आहे.