<
दिनांक: २८ एप्रिल २०२०, मुंबई प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधी होत आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या धर्तीवर देशात सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आहे. सर्व उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विडिओ कॉन्फेरेंसिंगद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. पण ज्यांच्याकडे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटक न ग्रामीण भागातील विद्यार्थी या बाबींपासून वंचित राहत आहेत. पुरेशा सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
म्हणूनच श्री. संजयजी पवार यांच्या वतीने केंदीय तसेच राज्य शिक्षण मंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे.
सदर पत्रात त्यांनी आर्थिक दुर्बल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लॉकडाऊन कालावधीमध्ये शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासकीय दूरचित्रवाणी वाहिनी वर विद्यार्थ्यांचा अभ्यास प्रसारित केला जावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे व सादर आशयाचे पत्र प्रकाश जावडेकर, केंद्रीय प्रसारण मंत्री व श्रीमती वर्षा गायकवाड राज्य शिक्षण मंत्री यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आले आहे.