<
दिनांक: ३० एप्रिल २०२०, मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (६७) यांचे गुरुवारी सकाळी मुंबईच्या एच एन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे हि माहिती प्रसारित केली आहे. ऋषी कपूर मगाचच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेहून भारतात परत आले होते. अमेरिकेत एक वर्षभर त्यांच्यावर कँसर सारख्या दुर्धर आजारावर उपचार चालू होते. माहितीच्या अनुसार ऋषी कपूर याना चेस्ट इन्फेकशन, श्वास घ्यायला त्रास होणे व हलका ताप सुद्धा होता. त्यांचे कोविड-१९ टेस्ट सुद्धा केली जाणार आहे.
ऋषी कपूर यांचे बॉलिवूड मधील योगदान हे कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अचानक एका पाठोपाठ एक दिग्गज अभिनेत्यांचे निधन होणे हि अतिशय वेदनादायक बाब आहे.