<
जळगांव(प्रतिनीधी)- शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या १एप्रिल २०१९ पासून वेतन अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला आहे मात्र निधी वितरणाचा आदेश प्रलंबित आहे. कोरोना ही वैश्विक महामारी अतिशय भयानक रूप घेत आहे. यासोबतच गेली १५ ते २० वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना बेठबिगारी या अनैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. यावर वेळीच उपाय योजिले नाहीत तर पिढ्या घडविनारा हा शिक्षक आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही. कोरोना आपत्ती प्रसंगी इतर घटक व क्षेत्राना मदतीचा हात आपण देत आहात. यामुळेच २०% वेतन अनुदान निधी वितरणाचा आदेश त्वरित निर्गमित करावा तसेच अघोषितला घोषित करून त्यांच्या पहिल्या टप्प्याचीतरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या यशवंत यांनी पत्राद्वारे केली आहे.