<
जळगांव(प्रतिनिधी)- जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाचा आर्थिक कंबरडं मोडून काढल आहे. याच आजाराने भारतात सुद्धा शिरकाव करुन भारतातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक कंबरडं मोडलं गेलं आहे. या परिस्थितीत सामान्य लोकांना दोन वेळच्या जेवणाचं अन्न मिळणं सुद्धा कठीण झालंय, त्यावरती आपण दिनांक १जानेवारी २०२० रोजी पत्रक काढून विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा निर्णय घेतला आहे. अश्या संकट काळात येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढीच्या निर्णयामुळे कुठल्याही सामान्य विद्यार्थ्यांला शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही.व त्यामुळे विद्यार्थी कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. म्हणून आपण पुन्हा एकदा आलेल्या निर्णयावर फेर विचार करावा, व तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय युवक महासंघाच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.