<
सोलापूर – एकीकडे उद्या महाराष्ट्र दिन साजरा होत असताना स्व. यशवंतराव चव्हाण ते मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचापर्यंतचा मुख्यमंत्रीचा काळ या महाराष्ट्र मधील जनतेने पहिला अनेक राजकीय समीकरणे घडताना बिघडताना याच जनतेनी पहिली पण आज जे राजकीय खेळी आपण खेळत आहात ती महाराष्ट्र मधील जनतेला न आवडणारी घटना,विधानसभा निवडणुकीच्या काळात आपण पवार साहेबांना ED ची नोटीस पाठवून जे गचाळ राजकारण करू पाहत होता ,तीच गोष्ट महाराष्ट्र च्या जनतेला पटली नाही,त्यामुळे आपली लोकप्रियता कमी झाली ,अन पक्षाचीही त्यात आपण नको त्या आविर्भावात मुलाखती दिल्या त्याचा परिणाम उलटा झाला अन जो पक्ष 10 सुद्धा जागा जिंकतो की नाही अशी अवस्था असताना केवळ कृषीरत्न शरदचंद्रजी पवार साहेब च्या नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकत त्या पक्षाला 54 जागा दिल्या,शेवटी साहेब आहेत पण जो अविर्भाव त्याकाळात दाखवला तोच शब्द डोक्यात ठेवून साहेबाना जे राजकीय खेळी खेळायची होती ती खेळून बसले अन 105 जागा घेऊन सर्वात मोठा असणारा भाजपाला विरोधीपक्ष म्हणून बसावे लागले,,हा इतिहास तुम्ही आम्ही पाहिला, आज संपूर्ण देश, त्याच बरोबर महाराष्ट्र वर कोरोनाचे संकट असताना जनतेला धीर देण्याच्या दृष्टीने आपल्या पक्षाने किंचित सुद्धा जबाबदारी दाखवली नाही तर उलट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सदस्यतत्व बाद कसे होईल,यासाठी आपण प्रयत्न करू लागला,हे संपूर्ण महाराष्ट्र ने पाहिले,आज महाराष्ट्र च्या जनतेला सर्व पक्ष येऊन यातून बाहेर कसे पडायचे हे पहायचे सोडून आपण राजकारण करत बसला,हे चुकीचे आहे, यातून आपली प्रतिमा अजून धुळीला मिळाली,मान्य आहे आपण सत्तेतून बाहेर फेकले गेला, याचे दुःख राहनार पण ही वेळ चुकीची निवडली आपण पण महाराष्ट्र मधला तरुण व जनता हे आपलं गचाळ राजकारण कधी ही विसरणार नाही,, कोल्हापूर भागात पुराचे थैमान माजले त्यावेळीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा चालू होती त्याच काळात पवार साहेबांनी ती यात्रा आहे त्याठिकाणी थांबवून सर्व नेते अन पदाधिकारी कोल्हापूर च्या जनतेच्या मदतीला धावून आले होते त्यावेळी नाही ते राजकारण करत बसले,तसे करायचे असते तर त्यांनी खूप मोठ्या सभा घेऊ शकते असते पण ज्यावेळी महाराष्ट्र वर संकट येईल त्यावेळी सर्व हेवेदावे ,राजकीय कुरघोडी विसरून अडचणीत असलेल्या महाराष्ट्र ला सावरण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे म्हणून राष्ट्रवादी पक्ष कोल्हापूर च्या पुरात सुद्धा जनतेच्या मदती साठी झटत होता,पण आज आपण काय करता ,याचा थोडा तरी विचार आपल्या भारतीय जनता पक्ष्याने करणे गरजेचे होते ते करू शकला नाही कारण,स्व अटलबिहारी वाजपेयी,स्व प्रमोद महाजन, स्व,सुषमा स्वराज्य यांचे विचार विसरलात, पण हा महाराष्ट्र आपण केलेले राजकारण कधीच विसरणार नाही हे ही लक्षात असू ,राजकीय होत राहील,ते कायम चालूच राहणार पण महाराष्ट्र मधील 12 कोटी जनता मरणाच्या दारात उभी असताना एकीकडे शिवसेना,काँग्रेस ,राष्ट्रवादी, चे मंत्री आपली जीवाची पर्वा न करता जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्न करते अन आपण दिवसातून 2 वेळा जो भाजपा च्या दावणीला राज्यपाल बांधला गेला त्याच्या गाठीभेटी घेता,अस गचाळ राजकारण आपल्या सुसंकृत पक्षाकडून होईल अशी अपेक्षा नव्हती,पण एक लक्षात ठेवा,भले सरकार पडेल पण आज तुम्ही 105 म्हणून घेत आहात ना ? त्यातील फक्त आपल्याकडे 40 ते 51 आमदार येत्या काळात आपले असतील अन बाकीचे सत्तेतील महाविकास आघाडीचे असतील हा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्र मधील जनतेवर आहे.
फडणवीस साहेब ,,तुम्ही केलेले गचाळ राजकारण महाराष्ट्र मधील युवक व जनता कधी ही विसरणार नाही असा सवाल राष्ट्रवादी युवा प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी फडणवीस यांना केला.