<
जळगाव – (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमिवर येथील भारतीय जनता पार्टी केमिस्ट महासंघातर्फे शासनास २२ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली.
कोरोनामुळे देशात आणि राज्यात अनेकांचे रोजगार बुडाले असून या महामारीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पाळतीवर मदतकार्य करीत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील केमिस्ट महासंघातर्फे प्रधानमंत्री केअर निधीला ११ हजार तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजार असे एकूण २२ हजारांची मदत केली आहे.
समाजसेवेसाठी सैदव तयार असलेल्या महासंघातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. लॉकडाऊनमध्येही महासंघातर्फे अनेकांना फूट पॅकेट वाटप करण्यात आले आहे. तसेच यापुढे असेच मदतकार्य सुरु असेल, किशोर भंडारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.