जळगांव(प्रतिनीधी)- येथील रोटरी क्लब जळगाव स्टार तर्फे जळगाव शहर व पाळधी या भागातील तृतीयपंथींना मास्क, १०० किलो गहू, ५० किलो तांदूळ, १५ किलो तेल, साबण, साखर, इत्यादी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. समाजातील या घटकाकडे मदत पोहोचली नव्हती म्हणून रोटरी स्टार्स ने पुढाकार घेतला या मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघण्यासारखे होते. प्रसंगी उपस्थित अध्यक्ष सागर मुंदडा, धनराज कासट, जिनल जैन, करण ललवाणी, निकुंज अग्रवाल, योगेश कलंत्री आदी उपस्थित होते.