वरणगावं(प्रतिनिधी):- खा. शरदजी पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड वितरित करण्याचे कार्य सुरू आहे. आज वरणगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या नियोजनातून राज्यातील हजारो डॉक्टर व कर्मचाऱ्यांना हे शिल्ड देण्यात आलेले आहेत. वरणगांव येथे फेस शील्ड वितरीत करतांना जळगाव जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष रवींद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी, विष्णु नेमीचंद खोले,रवींद्र शांताराम सोनवणे, गणेश सुपडू चौधरी,समाधान जगदेव चौधरी तालुका अध्यक्ष दिपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, प्रकाश नारखेडे युवक शहरअध्यक्ष, प्रशांत मोरे रवींद्र पाटील,साजिद कुरेशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.