पंढरपूर शहरातील राजाराम नगर बार्शी रोड पंढरपूर येथे राहणाऱ्या सौ शालन राजेंद्र माचले या आजी कॅन्सर आजाराने त्रस्त असल्यानं त्यांना गेली 4 दिवस खूप त्रास होत होता ,त्याच वेळी त्या सौ माचले आजीचे नातेवाईक यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क केला,त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्या आजीची सर्व माहिती ऑनलाइन पास साठी प्रयत्न केले पण त्यांचा पास ला काही तरी तांत्रिक अडचण होती ,सलग दोन दिवस प्रयत्न करून सुद्धा त्यांना पास मिळाला जात नव्हता ,आज मात्र माचले यांना खूपच त्रास होत होता त्यावेळी त्यांनी शिंदे यांना फोन करून त्या फोनवर रडल्या त्यावर श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ त्यांना सुप्रियाताई सुळे यांना बोलून घ्या म्हणून सांगितले आणि शिंदे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील यांना मेसेज केला अन सर्व हकीकत सांगितले नंतर सर्व वस्तुस्थिती पाहून पोलीस आयुक्त पाटील साहेब यांनी शिंदे च्या मेसेज ची दखल घेऊन त्या माचले आजी यांना तात्काळ सर्व कागदपत्रे ऑनलाइन चेक करून त्यांना आजाराचे गांभीर्य पाहून इमर्जन्सी पास देण्याची व्यवस्था करण्यात आली,
ज्यावेळी पास आल्याची माहिती त्या आजीच्या मुलाला आकाश माचले ला दिल्यानंतर तो अक्षरशः फोनवरच रडू लागला,आईचे होणारा त्रास पाहून आम्ही ही थकलो होतो ,पण कधी ही न भेटलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यानी आम्हाला केलेली मदत ही खूप मोलाची आहे,असे सांगितले ,,,
श्रीकांत शिंदे यांना बोलल्यानंतर ते म्हणाले की याच आजीचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या ज्या अडचणीत असलेले कॉल येत आहेत त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख ,कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण युवक टीम जनतेला सहकार्य करण्यासाठी उभी राहत आहे,अडचणी च्या काळात जनतेच्या पाठीशी उभे रहा हीच आमच्या नेत्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सौ सुप्रियाताई सुळे,जयंत पाटील साहेब यांची शिकवण आम्हाला आहे असे म्हणाले,
आज अभिमान वाटतो की माझ्या ऐका मेसेज ची दखल घेऊन पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील साहेब यांनी जी मदत केली हे आम्ही कधी ही विसरू शकणांर नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री. श्रीकांत शिंदे यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी तसेच समाजाच्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.