कळंब,तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाय योजना राबवल्या जात असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी /कामगार/इतर व्यक्तींसाठी खुशखबर आहे.
उस्मानाबाद जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/zyuRtu1yMFBqGqQq6 या लिंक वर माहिती भरावी.
तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना उस्मानाबादमध्ये येण्याकरिता या https://forms.gle/Pt3tKxQwG9dmptyJ8 लिंकवर माहिती भरावी.
सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.
????अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा
????उस्मानाबाद जिल्ह्यामधून इतरत्र जाणाऱ्यांसाठी संपर्क क्रमांक-
राजकुमार माने, तहसीलदार , उस्मानाबाद +919422466801
पंकज मंदाडे, नायब तहसिलदार
+919604601795
???? इतर जिल्ह्यातून उस्मानाबाद मध्ये येण्यासाठी संपर्क क्रमांक-
सुधाकर आडे, ज़िल्हा नियोजन अधिकारी, उस्मानाबाद
+918975973811
चेतन पाटील, नायब तहसीलदार
+919970183159
02472-225618
????जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद.????
सदरील सेवा फक्त लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर अडकलेल्या कामगार, विदयार्थी, प्रवाशी यांच्यासाठीच आहे असेही जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.