जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा खु. येथील श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळेसोबत ग्रामीण शाळांना ही दि. १८ मार्च पासून सुट्टी घोषित करण्यात आली. श्री स्वामी समर्थ सीबीएसई कुसुंबा (खु) शाळेने शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर विद्यार्थ्यांना रोज गृहपाठ देणे सुरू केले. वर्चुअल क्लासेस द्वारे त्यांना प्रश्नपत्रिका सोडवणे, सराव करणे यासारखे उपक्रम ३० एप्रिल पर्यंत राबवले.
या ऑनलाईन वर्च्युअल क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढाच सहभाग नोंदवला व त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. व्हाट्सअप वर रोज शिक्षक, विद्यार्थी व पालक सुसंवाद साधत होते. पालकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक संस्था तथा ग.स.अध्यक्ष मनोजकुमार पाटील, मुख्याध्यापिक तनुजा मोती व संचालिका प्रतीक्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.