बदलापूर(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरांमधून जनजागृती केली जात आहे. तसेच पोलीस, डॉक्टर, सफाई कमागार आणि इतर अनेक लोक दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. तरी देखील लॉकडाउनच्या काळात अनेक लोक बाहेर फिरतांना दिसत आहे.
यातच कोरोनाला हरविण्यासाठी बदलापूरच्या एअर सन स्कूलच्या लहानग्या चिमुकल्यांनी देखील कुठलीही कसर न सोडता कोरोनाला हरवण्यासाठी अनोख्या पद्धतीने जनजागृती करत घरात थांबून कोरोनाला हरविण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आह. संदेश देणाऱ्या चिमुकल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत जय, प्रांजल, सई, श्लोक, क्षितिज, वैदेही, गौरंग.