प्रतिनिधी – भांडुप
भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखे पुण्य दुसऱ्या कशातही नसते. अशाप्रकारे कर्मयोगी संत गाडगे बाबा यांची विचारधारा डोक्यात उतरवून , कुठलाही प्रकारचा मतभेद, जातिभेद ,राजकारण, न करता भूकेल्यांच्या पोटात दोन घास गेले पाहिजेत, हीच भावना माणसाला स्वर्गाचा आनंद देऊन जाते. नेमका हाच आनंद आज भांडुपकरांनी अनुभवला.
शिवसेनेचे विभागप्रमुख, नगरसेवक,व आमदार रमेश कोरगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व भांडुप विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने, आज शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांच्या उपस्थितीत
पहिल्या टप्प्यात 1200 निराश्रित, वृध्द व्यक्ती, गोरगरीब नागरिकांना , निराधारांना व गरजवंत कुटुंबांना, तांदूळ, गव्हाचे पिठ, डाळ , तेल, मीठ ,कांदे, बटाटे, साबण इत्यादी जीवन आवश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे आमदार रमेश कोरगावकर यांनी आदर्श ठेवला आहे. माझ्या मतदारसंघातील एकही गरीब उपाशी राहता कामा नये, लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, यावेळी अपंग, वृद्ध, निराधार ,लोकांना उपासमारी सारख्या समस्येला सामोरे जाऊ नये, यासाठी पहिल्या टप्प्यात 1200 कुटुंबीयांना अन्नधान्य साहित्याचे वाटप केल्याचे सांगून पुढील टप्प्यात आणखी ५००० हजार कुटुंबीयांंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्याचा माझा मानस असल्याचे आमदार रमेश कोरगावकर यांनी सांगितले.
विशेष करून सोशल डिस्टन्सिनचे पालन करून, कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, जिवनावश्यक अन्नधान्य, व किराणा साहित्याचे वाटप स्थानिक शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,गटप्रमुख,व शिवसैनिकांच्या उपस्थितीत केले गेले.
अनेक मजूरदार, श्रमिक कुटुंबाची मोठी उपासमार होत आहे. कामधंदा ठप्प पडल्यामुळे पैशांची आवक नाही .त्यामुळे जगावे कसे हा प्रश्न ? त्यांच्यापुढे उभा टाकला होता. आणि ही बाब आम. कोरगावकर यांच्या लक्षात येताच, गोरगरीब गरजू निराधार कुटुंबीयांना एक हात मदतीचा पुढे केला आहे.