जळगांव(प्रतिनीधी)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड१९ या महामारीच्या भयामुळे संपूर्ण समाजाला लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे पण ही एक समस्या न समजता सुरक्षितता समजून संधीत रूपांतरित करण्यासाठी पाठयपुस्तक मित्र हा उपक्रम सुरू करण्याची संकल्पना मनात आली.
या उपक्रमाद्वारे समाजातील विविध विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात लागणारी पाठयपुस्तके घरपोच उपलब्ध करून देत आहे. सदर उपक्रमात आतापर्यंत बऱ्याच पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांची मागील वर्षाची पाठयपुस्तके देऊन अभ्यासू व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.या लॉकडाऊनचा काळात बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी मोबाईल अँपद्वारे विद्यार्थांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे परंतु मोबाईल अँपद्वारे शिक्षण घेणे हे पाठय पुस्तकांद्वारे होणाऱ्या शिक्षणाइतके एकरूप वाटत नाही म्हणून या लॉकडाऊनमध्ये आपल्या घरीच सुरक्षित बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक मित्रांचा मदतीचा हात. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर ही परिस्थिती गंभीर राहू शकते. म्हणून, श्री स्वामी समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयाचे शिक्षक हेमंत सोनार हा उपक्रम राबवत असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसेच या उपक्रमा संदर्भात ८००७७८१७८९, ७५०७६९५७५७ या नंबरवर संपर्क करण्याचे त्यांनी कळविले आहे.