विरोदा(किरण पाटिल)- अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत भारतभर व महाराष्ट्रातील अग्रवाल समाजातील सर्वांसाठी अग्रसेन महाराज व अग्रवाल समाजाचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना लोकडाऊन मुळे सर्व विद्यार्थी, व्यापारी घरीच आहेत. अखिल भारतीय अग्रवाल संमेलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी कडून अग्रसेन महाराज व अग्रवाल समाजचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेत महाराष्ट्र व भारतात कुठे राहत असलेले अग्रवाल समाजातील व्यक्ती भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत निबंध १००० शब्दात पाहिजे जास्त नको. निबंध स्वतःच्या हस्ताक्षर मध्ये लिहिणे आवश्यक आहे. शुद्ध लेखन वर लक्ष असावे. निबंधवर नाव, मोबाईल नंबर, ग्रुप टाकणे आवश्यक आहे. त्या शिवाय नोंदणी करता येणार नाही. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्यास सम्मान पत्र तथा विजेत्या व्यक्तीस सम्मान चिन्ह देण्यात येईल. या स्पर्धेत ग्रुप A – वय १५ वर्ष, ग्रुप B – वय ३० वर्ष पर्यंत ग्रुप C – ३० वर्षा पुढील असे तीन गट करण्यात आलेले आहेत. निबंध १५ मे पर्यंत खालील पदाधिकारी यांचे वॉट्सअप वर पाठवावे अनूप गुप्ता मुंबई,अध्यक्ष 9821013269 गोपाल बाबूलाल अग्रवाल खामगांव उपाध्यक्ष 94231 29800, उमेश खेतान अकोला उपाध्यक्ष 9423129800, जितेंद्र अग्रवाल जालना सचिव, 9423156977, नंदकिशोर अग्रवाल फैजपुर प्रचार मंत्री /प्रकल्प प्रमुख 9923189545, आर्किटेक्ट पंकज अग्रवाल खामगांव बुलढाणा जिला अध्यक्ष 9423144139 असे प्रचार मंत्री व प्रकल्प प्रमुख नंदकिशोर अग्रवाल फैजपूर यांनी कळविले आहे.