<
कळंब, तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कारोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. कळंब तालुक्यातील मोहा येथे पोलिस पाटील प्रकाश गोरे आणि तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके गावात गस्त घालून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करत आहेत तसेच कोणीही घराबाहेर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असेही सांगत आहेत.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गावामध्ये आदर्श असे काम केले आहे.
गावामध्ये कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. मोहाचे सरपंच राजू झोरी , ग्राम विकास अधिकारी सी एन लोकरे ,सहशिक्षक संजय मडके , सहशिक्षक राजकुमार जावळे, सलीम मोमीन, तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके , जमीर शेख, दवंडीवाले दासा पायाळ तसेच आशा, अंगणवाडी कार्यकर्ती हे सर्वजण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस जनजागृती करत आहेत.तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत.