Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेची 23 नागरी आरोग्य केंद्रे व 4 रूग्णालय याठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुरू करण्यात आलेली आहेत. या शिवाय आशियातील सर्वात मोठी असणारी कृषी बाजारपेठ असणाऱ्या एपीएमसी मार्केटमधील पाचही बाजारात कोव्हीड-19 तपासणी केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत.

तथापि मागील काही दिवसांमध्ये एपीएमसी मार्केट परिसरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याठिकाणी कोरोना विषयक तपासणीचे विशेष शिबिर लावण्याचे नियोजन होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार आज एपीएमसी मार्केटमध्ये महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना विषयक विशेष तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये 4 हजाराहून अधिक व्यापारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, कामगार, मजूर यांची कोव्हीड-19च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.

या तपासणीकरिता एक डॉक्टर व त्यांच्यासमवेत पॅरामेडीकल स्टाफ असे 30 वैद्यकिय समूह तयार करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेद्यकीय समुहासह डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालय आणि तेरणा रूग्णालय या रूग्णालयांचे वैद्यकीय समुह देखील सहभागी होते. या डॉक्टर्समार्फत उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांचे थर्मल स्कॅनींग करण्यात आले. तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा या काळात एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशी संपर्क आला होता काय ? त्यांना सर्दी, ताप, खोकला. श्वास घेण्यास त्रास यापैकी काही लक्षणे जाणवतात काय? अशा प्रकारची माहिती विचारण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले. या स्वॅब कलेक्शनकरिता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह 2 मोबाईल रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या विशेष तपासणी शिबिराचा लाभ एपीएमसी मार्केट मधील 4 हजाराहून अधिक व्यक्तींनी घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

ठाणे जिल्हा हद्दीतून इतर ठिकाणी जाण्यासाठी अॉनलाईन अर्ज करावेत

Next Post

ठाणे जिल्हा हद्दीतून इतर ठिकाणी जाण्यासाठी अॉनलाईन अर्ज करावेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo